मुस्लीम राष्ट्रांची एकी, भारतासाठी डोकेदुखी? सौदी-तुर्की आणि पाकिस्तानची एकजूट

New Muslim Alliance Sparks Global Debate, India on Alert: आता बातमी भारताचं टेन्शन वाढवणारी.....मुस्लीम राष्ट्रांनी युरोपच्या धरतीवर आता इस्लामिक नाटोची स्थापना केलीय. पाकिस्तानसोबत कोणते देश आले आहेत? याचा भारतावर काय परिणाम होणार आहेत? पाहूयात हा रिपोर्ट....
Pakistan, Turkey and Saudi Arabia leaders during a strategic defense meeting signaling formation of a new military alliance
Pakistan, Turkey and Saudi Arabia leaders during a strategic defense meeting signaling formation of a new military alliancesaam tv
Published On

मध्यपूर्वेत सुरु असलेलं युद्ध आणि सुरक्षेच्या मुद्द्यावरून आता मुस्लीम देशांनी एकत्र येण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. युरोप आणि अमेरिकेच्य़ा नाटोच्या धरतीवर इस्लामिट नाटो स्थापन करण्यात आलंय. याचं पहिलं पाऊल पाकिस्तान, सौदी अरेबिया आणि तुर्की या तीन देशांनी उचललंय. या तिघांनी ‘मक्का संयुक्त संरक्षण करारा’ केलाय. या करारानुसार तिन्ही देशांपैकी कोणत्याही एका देशावर हल्ला झाला तर तो इतर दोघांवरील हल्ला मानला जाणार आहे. विशेष म्हणजे या तीन देशांच्या युतीमध्ये तिन्ही देशांनी आपल्या जबाबदाऱ्या वाटून घेतलेत...

सौदी अरेबिया या करारानुसार आर्थिक भांडवल आणि मोठा निधी पुरवणार आहे.

तुर्की आपल्या प्रगत नाटो-दर्जाचे ड्रोन तंत्रज्ञान, अत्याधुनिक नौदल अभियांत्रिकी आणि इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर प्रणाली पुरवणार आहे.

तर पाकिस्तान आपले अफाट सैन्यबळ आणि अण्वस्त्र सज्जता युद्धजन्य परिस्थितीत पुरवेल...

या करारामुळे पाकिस्तानला तुर्कीकडून अत्याधुनिक लष्करी तंत्रज्ञान आणि रसद पुरवठा मिळून त्याची ताकद वाढण्याची शक्यता वर्तवली जातेय.. त्यामुळे भविष्यात भारत-पाकिस्तान संघर्षात तिन्ही देशांमध्ये झालेला हा करार भारताची डोकेदुखी वाढवणारा ठरू शकतो...तसचं सौदी अरेबियाच्या तटस्थतेवरही या करारामुळे परिणाम होऊ शकतो. मात्र यामुळे भारतासमोरील आव्हानं वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान या करारावर इराणनं आक्षेप घेतलाय...कागदी करारांमुळे सौदी अरेबियाला कोणतीही सुरक्षा मिळणार नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया इराणनं दिलीय. तर भविष्यात या तीन राष्ट्रांच्या आघाडीत आखाततले इतर मुस्लीम राष्ट्रही सहभागी होणार का? याकडे जगाचं लक्ष लागलयं...मात्र यामुळे पाकिस्तानचं फावण्याची भारताची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे एवढं नक्की.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com