आधी इराणचा गेम, आता 'या' देशांवर नेम, ट्रम्प यांचा नवा 'गेम प्लॅन' उघड

Impact of Iran war on India oil imports: अमेरिका आणि इराणमधील संघर्ष केवळ मध्यपूर्वेपुरता मर्यादित नसून त्यामागे चीनविरोधातील मोठी भू-राजकीय रणनीती असल्याची चर्चा आहे.
Missile smoke rises after an attack amid escalating tensions between Iran and the United States in the Middle East
Missile smoke rises after an attack amid escalating tensions between Iran and the United States in the Middle EastSaam Tv
Published On

इराणमध्ये हल्ले सुरू असतानाच, ट्रम्प यांनी आपला पुढचा मोर्चा आता क्युबाकडे वळवलाय़...अमेरिकेच्या फ्लोरिडा किनारपट्टीपासून अवघ्या ९० मैलांवर असलेलं एक छोटंसं बेट म्हणजे 'क्युबा'. पण गेल्या 60 वर्षांपासून हे बेट अमेरिकेच्या डोळ्यात खुपतयं.. खर तर डोनाल्ड ट्रम्प जेव्हा पुन्हा सत्तेत आलेले तेव्हाच ही चर्चा सुरू झाली होती की अमेरिकेचे पुढचे 'टार्गेट' क्युबा असेल का?पण आता तर ट्रम्प यांनी तसे स्पष्ट संकेतच दिले आहेत....

क्युबातील कम्युनिस्ट राजवट आता शेवटच्या घटका मोजतेय... क्युबात लवकर सत्तापालट होईल.. त्यासाठी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियोना पाठवण्यात येणार आहे...अमेरिकेतील क्युबन लोकांना काही दिवसानंतर त्यांच्या मायदेशी परतावे लागेल...50 वर्षांपासून क्युबाकडे माझं लक्ष असून तिथला सत्तापालट माझ्यामुळे होणार आहे..

दरम्यान ट्रम्प यांना क्युबा नेमकं का हवं आहे? पाहूयात..

क्युबाकडे स्वतःचे पुरेसे तेल साठे जरी नसले तरी त्याचं अर्थकारण तेलावर अवलंबून आहे. क्युबाला 'व्हेनेझुएला'कडून सवलतीच्या दरात तेल मिळतं. त्यामुळे

भौगोलिकदृष्ट्या क्युबा अमेरिकेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील आहे.

1962 मध्ये रशियाने क्युबात अण्वस्त्रं तैनात केली होती. आजही रशिया आणि चीनच्या युद्धनौका क्युबाच्या बंदरात आहेत. चीन क्युबाचा वापर आपल्यावर पाळत ठेवण्यासाठी करू शकतो अशी भीती अमेरिकेला वाटते...

क्युबामध्ये दशकांपासून कम्युनिस्ट पक्षाची राजवट आहे. तर ट्रम्प उघडपणे 'अँटी-कम्युनिस्ट' आहेत. त्यामुळे क्युबात लोकशाही आणण्याच्या बहाण्याने तिथे 'सत्तापालट' घडवून आणणं हे ट्रम्प यांचं मुख्य उद्दिष्ट असू शकतं.

अमेरिकेतील फ्लोरिडात क्युबातील हुकूमशाहीला कंटाळून आलेल्या 'क्युबन-अमेरिकन' लोकांची संख्या मोठी आहे.

या मतदारांना खुश करण्यासाठी क्युबावर कठोर निर्बंध लादणे ट्रम्प यांच्यासाठी फायद्याचे ठरू शकते.

खरतर क्युबा हे अमेरिकेसाठी केवळ एक बेट नाही, तर तो एक 'जिओ-पॉलिटिकल' गेम आहे. तेल रोखून क्युबाची नाकेबंदी करणं आणि तिथे आपल्या मर्जीतील सरकार बसवणं, हा ट्रम्प यांचा 'मास्टर प्लॅन' आहे... त्यामुळं जर क्युबा झुकला, तर संपूर्ण लॅटिन अमेरिकेत अमेरिकेचा दबदबा पुन्हा निर्माण होईल..हे ट्रम्प ओळखून आहेत आणि म्हणूनच आता पुढचं टार्गेट क्युबा असेल हे निश्चित....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com