Israel Iran War : इराणचे सर्वोच्च नेते खोमेनींचा मृत्यू, इस्राइलच्या हल्ल्यात कुटुंबाचा अंत

Israel Iran war : अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूबाबत दावे समोर आल्यानंतर इराण-इस्रायल संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांसह जागतिक नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत.
Israel Iran War
Israel Iran War
Published On

इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा ८६ व्या वर्षी मृत्यू झाला आहे. इस्रायल आणि अमेरिकेच्या संयुक्त लष्करी कारवाईत मृत्यू झाल्याचा खळबळजनक दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. स्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनीही खामेनी ट्रम्प यांच्या दाव्याला दुजोरा दिला आहे. इतिहासातील सर्वात क्रूर व्यक्तींपैकी एक असलेला खामेनी मारला गेला आहे. खानेमी आणि त्याच्या रक्तपिपासू गुंडांच्या टोळीने ठार केले किंवा कायमचे अपंग केले होते, असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.

ट्रम्प यांनी आपल्या 'ट्रुथ सोशल' प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत म्हटले की, खामेनेई आमच्या अत्याधुनिक ट्रॅकिंग सिस्टम आणि इंटेलिजन्सपासून वाचू शकला नाही. खामेनेईचा मृत्यू हा इराणच्या जनतेसाठी आणि ज्यांना त्याने त्रास दिला, त्या जगातील तमाम लोकांसाठी मिळालेला न्याय आहे, असे ट्रम्प यांनी म्हटले.... अमेरिकेने या मोहिमेत इस्रायलला पूर्ण तांत्रिक आणि लष्करी सहकार्य केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Israel Iran War
Plane Crash : नोटा घेऊन जाणारे लष्काराचे विमान कोसळले, १५ जणांचा मृत्यू, अपघातानंतरचा भयानक व्हिडिओ

इराणच्या सरकारी माध्यमांनी सुरुवातीला या वृत्तावर मौन बाळगले होते, मात्र नंतर खामेनी यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा देण्यात आला. दरम्यान, इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांनी हे हल्ले बेकायदेशीर असल्याचे सांगत बदला घेण्याचा इशारा दिला आहे. या हल्ल्यात इराणचे संरक्षण मंत्री आणि रिव्होल्युशनरी गार्ड्सचे (IRGC) प्रमुखही मारले गेल्याचे सांगितले जात आहे. इराणमध्ये ४० दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

Israel Iran War
Chembur Accident : मुंबईत भंयकर दुर्घटना, ८ व्या मजल्यावरून ६ कामगार पडले

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटे अमेरिका आणि इस्रायलच्या लढाऊ विमानांनी इराणमधील लष्करी तळ आणि सरकारी कार्यालयांवर जोरदार क्षेपणास्त्र हल्ले केले. यातील एक मुख्य निशाणा खामेनी यांचे तेहरानमधील निवासस्थान (कंपाउंड) होते. सॅटेलाईट फोटोंमध्ये या परिसराचे मोठे नुकसान झाल्याचे दिसून आले आहे. ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, "खामेनी आमच्या अत्याधुनिक ट्रॅकिंग सिस्टमपासून वाचू शकले नाहीत. इराणच्या जनतेला आपली सत्ता परत मिळवण्याची ही सर्वात मोठी संधी आहे."

Israel Iran War
Rajya Sabha : उद्धव ठाकरे खासदार होणार की आमदार? संजय राऊतांनी एका वाक्यात विषय संपवला

डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले ?

इतिहासातील सर्वात वाईट क्रूर माणसांपैकी एक असलेला खामेनेई मारला गेला आहे. तो आमच्या इंटेलिजन्स आणि प्रगत ट्रॅकिंग सिस्टमपासून वाचू शकला नाही. इस्रायलसोबत मिळून केलेल्या या कारवाईत तो आणि त्याच्यासोबतचे इतर नेते काहीही करू शकले नाहीत. इराणच्या जनतेसाठी आपला देश परत मिळवण्याची ही सर्वात मोठी संधी आहे. आम्हाला कळाले आहे की, इराणचे अनेक IRGC अधिकारी, सैन्य आणि पोलीस दलातील लोक आता लढू इच्छित नाहीत आणि त्यांना 'इम्युनिटी' (माफी/संरक्षण) हवी आहे. मी काल रात्री म्हटल्याप्रमाणे— 'त्यांना आता माफी मिळू शकते, पण उशीर झाला तर फक्त मृत्यू मिळेल. मला आशा आहे की IRGC आणि पोलीस दल शांततेने इराणच्या देशभक्तांशी हातमिळवणी करतील आणि देशाला पुन्हा एकदा त्या महानतेवर नेण्यासाठी एकत्र काम करतील, ज्याचा हा देश हक्कदार आहे, असे ट्रम्प यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

Israel Iran War
Shikhar Bank Scam : अजित पवार, सुनेत्रा पवारांना शिखर बँक घोटाळा प्रकरणी क्लीन चिट, रोहित पवारांनाही दिलासा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com