पश्चिम-आशियातील युद्ध थांबणार? इराणनं PM मोदींना सांगितली युद्ध थांबवण्याची अट

Iran-US War: युद्ध संपवण्यासाठी पहिली अट ही आहे की अमेरिका आणि इस्रायलने आपली आक्रमकता तात्काळ थांबवावी, असं इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी सांगितलं.
Iran-US War:
Iran signals ceasefire conditions during high-level talks with PM Modi amid escalating conflict.saam tv
Published On
Summary
  • इराणने युद्ध थांबवण्यासाठी अट मांडली

  • अमेरिका आणि इस्रायलने आक्रमकता थांबवावी, ही मागणी

  • मोदी आणि इराण राष्ट्राध्यक्षांमध्ये चर्चा

इराण-अमेरिका आणि इस्रायलमध्ये तुफान युद्ध पेटलंय. तिन्ही देशांकडून मिसाईल आणि ड्रोन हल्ले केले जात आहेत. इराणकडून अमेरिकेच्या हल्ल्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे. अमेरिकेने इराणवरील काही निर्बंध हटवत युद्ध संपवण्याचे संकेत दिलेत. दुसरीकडे इराणने आपले हल्ल्यांचा मारा वाढवलाय. इराण युद्ध थांबवण्याच्या मानसिकेतेत नाहीये. त्याचदरम्यान इराणचे राष्ट्राध्यक्ष आणि पंतप्रधान नरेंद मोदींनी फोनवरून युद्ध आणि दोन्ही देशांच्या व्यापारिक संबंधाबाबत चर्चा केली.

पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी शनिवारी (२१ मार्च, २०२६) भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवर संवाद साधला आहे. यावेळी दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंधांवर तसेच प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींवर यासह अमेरिका आणि इस्रायलकडून इराणविरुद्ध सुरू असलेल्या लष्करी कारवाईच्या संदर्भात चर्चा केली.

Iran-US War:
"...तर मुंबई-दिल्लीवर बॉम्ब टाका"; पाकिस्तानच्या अधिकाऱ्याचं वादग्रस्त विधान, भारत-पाक तणाव वाढणार?

इराणचे राष्ट्राध्यक्ष पेझेश्कियान यांनी अमेरिका, इस्रालय आणि इराणमध्ये पेटलेल्या युद्धाला बेकायदेशीर आणि गुन्हा असल्याचं म्हटलंय. पश्चिम आशियातील हे युद्ध इराणने सुरू केले नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितलं. इस्त्रायल आणि अमेरिकेने इराणमध्ये सुरू असलेल्या अणुचर्चेदरम्यान कोणत्याही वैध कारणाशिवाय, तर्काशिवाय किंवा कायदेशीर आधाराशिवाय इराणवर लष्करी हल्ले सुरू केले.

Iran-US War:
इराणच्या हल्ल्यांमागे चीनचा हात ? इराण-अमेरिका युद्धात चीनची उडी ?

या हल्ल्यांमध्ये इस्लामिक क्रांतीचे सर्वोच्च नेते, वरिष्ठ लष्करी कमांडर आणि निष्पाप शाळकरी मुलांसह अनेक निरपराध नागरिकही मारले गेले. या हल्ल्यांमुळे इराणच्या पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले आहे. अमेरिकेने शेजारील देशांमधील आपल्या लष्करी तळांवरून मिनाबमधील एका शाळेला लक्ष्य केले. यात १६८ निष्पाप शाळकरी मुलांचा जीव घेतला.

..तर अमेरिका आणि इस्रायलने हल्ले थांबवले पाहिजेत

इराण आपल्या शांततापूर्ण अणुकार्यक्रमाचे निरीक्षण आणि पडताळणी सुनिश्चित करण्यासाठी, जागतिक नेत्यांशी फोनवर किंवा प्रत्यक्ष भेटून संवाद साधण्यास नेहमीच तयार आहे. त्यामध्ये बाह्य हस्तक्षेपाशिवाय सहकार्याच्या माध्यमातून शांतता आणि स्थैर्य प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने, पश्चिम आशियाई देशांसोबत एक प्रादेशिक सुरक्षा चौकट तयार करण्याचा प्रस्तावही पेझेश्कियान यांनी फोनवर चर्चा करताना समोर मांडला.

युद्ध संपवण्यासाठी पहिली अट ही आहे की, अमेरिका आणि इस्रायलने आपली आक्रमकता तात्काळ थांबवावी. भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही याची हमी द्यावी. भारताच्या ब्रिक्सच्या फिरत्या अध्यक्षपदाचा उल्लेख करत, पेझेश्कियन यांनी इराणविरुद्धचे आक्रमण रोखण्यासाठी आणि प्रादेशिक व आंतरराष्ट्रीय शांतता व स्थैर्य जपण्यासाठी या गटाने स्वतंत्र भूमिका बजावावी, असेही आवाहन त्यांनी केले.

पंतप्रधान मोदींनी राष्ट्राध्यक्ष पेझेश्कियान यांना काय सांगितले?

पश्चिम आशियातील वाढत्या तणावावर आणि संघर्षावर तीव्र चिंता व्यक्त करत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रदेशातील ऊर्जा पायाभूत सुविधांवरील हल्ल्यांचा तीव्र शब्दांत निषेध केला. अशा कृतींमुळे जागतिक अन्न आणि ऊर्जा सुरक्षेला, यासह जगभरातील कृषी निर्यातीला गंभीर धोका निर्माण होतो. त्यांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीची सुरक्षा कायम राखणे आणि पर्शियन आखातातील नौकानयनाचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याच्या महत्त्वावरही मोदींनी भर दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com