Ganga Expressway: देशाला मिळाला नवा एक्सप्रेसवे; १२ जिल्ह्यातून जाणार, ५१९ गावे जोडणार, वाचा A टू Z माहिती

Uttar Pradesh infrastructure: गंगा एक्सप्रेसवेचे उद्घाटन झाल्याने उत्तर प्रदेशातील प्रवास जलद आणि सोयीस्कर होणार आहे. 594 किमी लांबीच्या या महामार्गामुळे 12 जिल्हे जोडले गेले असून प्रवासाचा वेळ निम्म्यावर येणार आहे, विकासाला मोठी चालना मिळणार आहे.
Uttar Pradesh infrastructure
Uttar Pradesh infrastructureSAAM TV
Published On

उत्तर प्रदेशात उभारण्यात आलेला गंगा एक्सप्रेसवे (Ganga Expressway) अखेर आज खुला करण्यात आला आहे. यामुळे यामुळे राज्याच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे. आज म्हणजेच २९ एप्रिल २०२६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या भव्य प्रकल्पाचं उद्धाटन केलं आहे.

सुमारे 594 किलोमीटर लांबीचा हा एक्सप्रेसवे केवळ उत्तर प्रदेशचाच नाही तर देशातील सर्वात लांब एक्सप्रेसवेपैकी एक मानला जातोय. पश्चिम ते पूर्व उत्तर प्रदेश असा मोठा भूभाग जोडणारा हा एक्सप्रेसवे आहे. या मार्गात तब्बल तब्बल 519 गावं आणि 12 जिल्ह्यांना एकत्र जोडलंय.

कुठून होणार एक्सप्रेसवेची सुरुवात?

या एक्सप्रेसवेची सुरुवात पश्चिम उत्तर प्रदेशातील बिजौली गाव (NH-334) याठिकाणाहून होते. तर शेवट प्रयागराजमधील जुडापूर डांडू गाव (NH-19) याठिकाणी होतो. या संपूर्ण प्रकल्पासाठी सुमारे 36,230 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.

Uttar Pradesh infrastructure
Mumbai-Pune in Just 48 Mins: मुंबई पुणे ४८ मिनिटांत, अमरावती हैदराबाद फक्त ७० मिनिटांत; बुलेट ट्रेनचा नवीन मार्ग; रेल्वे मंत्र्यांनी दिली माहिती

12 जिल्ह्यांना जोडणार

हा एक्सप्रेसवे मेरठ, हापुड, बुलंदशहर, अमरोहा, संभल, बदायूं, शाहजहांपूर, हरदोई, उन्नाव, रायबरेली, प्रतापगड आणि प्रयागराज या 12 जिल्ह्यांमधून जातो. सध्या हा 6-लेनचा मार्ग आहे. येत्या भविष्यात तो 8-लेन करण्याचा आराखडा तयार आहे.

या प्रकल्पाची आणखी एक खासियत म्हणजे शाहजहांपूर जिल्ह्यात 3.5 किलोमीटर लांबीची हवाई पट्टी तयार करण्यात आलीये. आपत्कालीन परिस्थितीत भारतीय वायुसेनेची लढाऊ विमानं याठिकाणी सहज उतरू शकतात आणि उड्डाणही करू शकतात.

गंगा आणि रामगंगा नद्यांवर दोन मोठे पूल उभारण्यात आले आहेत. त्यासोबतच 14 मोठे पूल, 126 लहान पूल, 8 रोड ओव्हरब्रिज आणि 18 फ्लायओव्हर बांधण्यात आले आहेत. वाहनांची ये-जा सोपी व्हावी म्हणून 18 इंटरचेंजची व्यवस्था करण्यात आली आहे.

Uttar Pradesh infrastructure
Crime news: रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा विवस्त्र मृतदेह आढळला; फ्लॅटचे दार तोडून पोलीस आत घुसताच उडाली खळबळ

या मार्गावर वाहनं ताशी 120 किलोमीटर वेगाने धावू शकतील, अशा पद्धतीने डिझाइन करण्यात आलं आहे. सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे, डिजिटल साइनबोर्ड आणि तातडीची वैद्यकीय मदत मिळावी यासाठी अॅम्ब्युलन्सची सुविधाही उपलब्ध आहे.

प्रवासाचा वेळ होणार निम्मा

या एक्सप्रेसवेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे प्रवासाचा वेळ निम्म्यावर आला आहे. पश्चिम उत्तर प्रदेशातून पूर्व भागात पोहोचण्यासाठी आधी 12 तास लागत होते ते आता केवळ 6 तासांत शक्य होणार आहे.

Uttar Pradesh infrastructure
Mumbai Police: मुंबईमध्ये भयंकर अपघातात पोलिसाचा मृत्यू, पुलाच्या कामावेळी पाइलिंग रिग मशीन अंगावर कोसळली

इतर सोयीसुविधा

याशिवाय प्रवाशांच्या सोयीसाठी मार्गावर रेस्टॉरंट, पेट्रोल पंप, ट्रॉमा सेंटर आणि पार्किंग झोनचीही सोय करण्यात आली आहे. या एक्सप्रेसवेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. पश्चिम उत्तर प्रदेशातील शेतकरी आता आपली शेतीमाल पूर्व भागात जलदगतीने पोहोचवू शकणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com