LNG Train : गुजरातमधून धावली देशातील पहिली LNG ट्रेन; वैशिष्ट्ये पाहून तुमचेही डोळे विस्फारतील

India's first LNG train launched in Gujarat : गुजरातमधील साबरमती रेल्वे स्थानकावरून देशातील पहिल्या LNG ट्रेनला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. LNG आणि डिझेलवर चालणाऱ्या या ट्रेनमध्ये २२०० लिटरची LNG टँक असून ४४४ किमीपर्यंत प्रवास करता येतो.
India's first LNG train launched in Gujarat
India's first LNG train launched in Gujarat
Published On: 

India's first LNG train : भारतीय रेल्वेच्या इतिहासात एक नवा अध्याय लिहिला गेला आहे. गुजरातमधूल पहिली एलएनजी ट्रेन धावली. आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुजरातच्या साबरमती रेल्वे स्थानकावरून देशातील पहिल्या एलएनजी (Liquefied Natural Gas) वर धावणाऱ्या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. पर्यावरणाचे रक्षण करणारी ही विशेष ट्रेन सध्या देशात कौतुकाचा विषय ठरत आहे.

या ट्रेनची थक्क करणारी वैशिष्ट्ये

या ट्रेनचे इंजिन एलएनजी (LNG) आणि डिझेल अशा दोन्ही इंधनांवर चालू शकते. एलएनजीचा साठा संपला तरीही गाडी न थांबता थेट डिझेलवर धावेल, ज्यामुळे प्रवासात कोणताही अडथळा येणार नाही.

या आधुनिक तंत्रज्ञानामुळे ट्रेन चालवताना तब्बल ४० टक्क्यांपर्यंत डिझेलची बचत होणार आहे.

या ट्रेनमध्ये २,२०० लिटर क्षमतेची एलएनजी टँक बसवण्यात आली आहे. एकदा ही टँक फुल्ल केली की ही गाडी तब्बल ४४४ किलोमीटरचा प्रवास सहजरित्या पूर्ण करू शकते.

चाचण्यांमधील आकडेवारीनुसार, या तंत्रज्ञानामुळे एका ८-कोचच्या ट्रेनमागे रेल्वेचे वर्षाला तब्बल २३.९ लाख रुपये वाचणार आहेत.

एलएनजीच्या वापरामुळे कार्बन डायऑक्साइड (CO₂), नायट्रोजन ऑक्साइड आणि घातक धुराचे प्रमाण अत्यंत कमी होणार असून हवा शुद्ध राहण्यास मदत होईल.

एलएनजी इंधनाचा वापर केला तरी इंजिनची क्षमता, वेग आणि पिकअप यात कोणताही फरक पडणार नाही, असे रेल्वेने स्पष्ट केले आहे.

India's first LNG train launched in Gujarat
Nitin Gadkari : पेट्रोलचे टेन्शन विसरा! आता २५ रुपये लिटरमध्ये धावणार कार; गडकरींचा दावा पाहून बसेल धक्का

यावेळी बोलताना गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले की, २०१५-१६ मध्ये भारतीय रेल्वे वर्षाला २९३ कोटी लिटर डिझेल वापरत होती. यामध्ये आता मोठी घट झाली आहे. सध्या रेल्वे १०८ कोटी लिटर डिझेल वर्षाला वापरते. २०३० पर्यंत रेल्वेचा डिझेल वापर पूर्णपणे 'शून्य' (Zero Diesel) करण्याचे उद्दिष्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ठेवण्यात आले आहे.

India's first LNG train launched in Gujarat
Political Row : भाजप मंत्री ऑन कॅमेरा भडकला! थेट तरुणाच्या कानशिलात हाणली; Video प्रचंड व्हायरल

तसेच या कार्यक्रमादरम्यान अमित शाह यांच्या हस्ते साबरमतीमध्ये तब्बल १,५४२ कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याच्या विविध रेल्वे प्रकल्पांचे उद्घाटन व पायाभरणी करण्यात आली. यात गाड्यांच्या सुरक्षेसाठी 'कवच' (Kavach) सिस्टीम आणि स्वदेशी ड्युएल इलेक्ट्रिक लोकोमोटीव्हच्या कामांचाही समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com