काश्मीरमध्ये भारतीय जवानांना मोठं यश; 'लश्कर'च्या कमांडरला यूसमर्गच्या एन्काउंटरमध्ये टिपलं

Lashkar commander Yasir killed in Yusmarg encounter : यूसमर्गच्या चकमकीत पाकिस्तानी 'लश्कर'चा कमांडर यासिरचा खात्मा करण्यात आला. यासिर हा यूपूर्वी सुलेमान मुसा गटात होता. वर्षभरापूर्वी तो या गटातून बाहेर पडला होता.
काश्मीरमध्ये भारतीय जवानांना मोठं यश; 'लश्कर'च्या कमांडरला यूसमर्गच्या एन्काउंटरमध्ये टिपलं
भारतीय जवान आणि दहशतवाद्यांच्या चकमकीत लश्करचा कमांडर यासिर मारला गेला. saam tv
Published On

yusmarg encounter lashkar commander yasir killed in kashmir : जम्मू-काश्मीरच्या यूसमर्गमध्ये सुरक्षा दलांचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये धुमश्चक्री झाली. सुरक्षा दलांच्या संयुक्त कारवाईत पाकिस्तानी 'लश्कर'चा कमांडर यासिरचा खात्मा करण्यात आला. सूत्रांच्या माहितीनुसार, चकमकीत मारला गेलेला यासिर हा सुलेमान मुसाच्या गटात होता. मात्र, जवळपास वर्षभरापूर्वी तो या गटातून बाहेर पडला होता.

सुरक्षा यंत्रणांच्या माहितीनुसार, यासिर हा यूसमर्गच्या वरच्या भागात सक्रिय असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा दलांनी या परिसरात शोधमोहीम सुरू केली. दहशतवाद्यांनी गोळीबार केल्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले. त्यात यासिर मारला गेला. सुलेमान उर्फ मुसा हा पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार होता. गेल्या वर्षी श्रीनगरमधील डाचीगाम जंगलात सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत सुलेमानचा खात्मा करण्यात आला होता.

जम्मू-काश्मीरमध्ये सुरू असलेल्या दहशतवादविरोधी मोहीमेंतर्गत यूसमर्गमध्ये शोधमोहीम हाती घेण्यात आली होती. दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या चकमकीत यासिर मारला गेला. यासिरचे नेटवर्क, लश्करच्या इतर दहशतवाद्यांसोबत त्याचा संपर्क आणि दहशतवादी कारवायांमध्ये, तसेच संभाव्य कटात त्याचा सक्रिय सहभाग होता का, याचा तपास सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.

तत्पूर्वी, काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात शुक्रवारी सुरक्षा दले आणि भारतीय जवानांनी केलेल्या कारवाईत एका दहशतवाद्याला कंठस्नान घातलं होतं. या परिसरात एक संशयित दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा दलांनी शोधमोहीम हाती घेतली होती.

काश्मीरमध्ये भारतीय जवानांना मोठं यश; 'लश्कर'च्या कमांडरला यूसमर्गच्या एन्काउंटरमध्ये टिपलं
Road accident: महामार्गावर रात्री भीषण अपघात! उभ्या लॉरीवर कार आदळून ८ इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com