Railway New Rules : रेल्वेच्या नियमात मोठा बदल; विनातिकीट प्रवास केल्यास दुप्पट दंड वसूल करणार

Indian Railways New Rule 2026 : ट्रेनमधून विनातिकीट प्रवास करणं यापुढच्या काळात महागात पडणार आहे. रेल्वेने दंडाच्या रकमेत दुपटीने वाढ केली आहे. यासंबंधी नवीन नियम लागू केला आहे.
विनातिकीट प्रवास कराल तर खबरदार, आता दुप्पट दंड भरावा लागणार, रेल्वेच्या नियमात मोठा बदल
Railway Changes rulessaam tv
Published On

रेल्वेच्या फुकट्या प्रवाशांना आता जबरदस्त फटका बसणार आहे. विनातिकीट प्रवास केल्यास संबंधित प्रवाशाला दुप्पट दंड भरावा लागणार आहे. रेल्वेने यासंबंधी नियम लागू केला असून, त्यानुसार, विनातिकीट प्रवास किंवा तसा प्रयत्न केल्यास देय किमान अतिरिक्त दंडाची रक्कम दुप्पट २५० रुपयांवरून ५०० रुपये केली आहे. त्याचप्रमाणे अनियमित प्रवासाशी सबंधित प्रकरणातही २५० रुपयांऐवजी आता ५०० रुपये अतिरिक्त किमान दंड वसूल केला जाणार आहे.

रेल्वे प्रवासात शिस्त, प्रवाशांच्या सुविधा आणि रेल्वे सुविधा सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने रेल्वे अधिनियमात सुधारित दंड आणि शिक्षा तरतूद लागू करण्यात आली आहे. रेल्वे अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, केवळ तिकीटच नाही, तर रेल्वे परिसरात अवैधरित्या प्रवेश करणे, अनधिकृत फेरीवाले, महिलांसाठीच्या राखीव डब्यात पुरुषांकडून होणारी घुसखोरी आणि रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सूचनांचे पालन न करणे यांसारख्या विविध नियमांच्या उल्लंघनाशी संबंधित सुधारित दंडाच्या रकमेत वाढ करण्याची तरतूद करण्यात आली आहे.

रेल्वे मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार, जन विश्वास (सुधारित) अधिनियम, २०२६ अंतर्गत रेल्वे अधिनियम १९८९ च्या विविध कलमांन्वये हे करण्यात आलेले महत्वपूर्ण बदल १९ जूनपासून लागू करण्यात आले आहेत. बऱ्याच वर्षांपासून दंडाच्या रकमेत काहीही बदल करण्यात आला नव्हता. सध्याच्या परिस्थितीनुसार हे बदल आवश्यक होते. त्या उद्देशाने रेल्वे प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे, असेही स्पष्ट करण्यात आले.

प्रवाशांमध्ये नियमांबद्दल अधिक जागरूकता निर्माण करणे, विनातिकीट प्रवास आणि बेकायदा प्रवास यांसारख्या गोष्टींवर नियंत्रण आणण्याचा यामागचा मुख्य उद्देश आहे. त्यानुसार, हा बदल करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे रेल्वे परिसरात आधीपेक्षा चांगली व्यवस्था सुनिश्चित केली जाऊ शकते, असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

विनातिकीट प्रवास कराल तर खबरदार, आता दुप्पट दंड भरावा लागणार, रेल्वेच्या नियमात मोठा बदल
Pune Railway Station: पुणे यार्ड रिमॉडेलिंग, ६ नवीन प्लॅटफॉर्म; पुणे रेल्वे स्थानकाचा होणार कायापालट!

रेल्वे प्रशासनाने लागू केलेल्या या नियमांमुळं वैध तिकीट काढून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्याचा अधिक फायदा होणार आहे. दंडात्मक कारवाईच्या भीतीने विनातिकीट किंवा बेकायदा प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत घट होणार आहे. तसेच रेल्वेच्या परिसरातील सुरक्षाविषयक व्यवस्था अधिक मजबूत होण्यास मदत होईल, असेही रेल्वे प्रशासनाचे म्हणणे आहे.

विनातिकीट प्रवास कराल तर खबरदार, आता दुप्पट दंड भरावा लागणार, रेल्वेच्या नियमात मोठा बदल
Pune Nashik Railway: पुणे-नाशिक रेल्वे मार्गात महत्वाचा बदल; ताशी १६० किमी वेगाने होणार प्रवास, कसा असेल संपूर्ण लोहमार्ग?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com