Indian Navy: भारतीय नौदलाची मोठी कामगिरी, समुद्री चाचांच्या तावडीतून १९ पाकिस्तानी नागरिकांची सुटका

Indian Navy rescues Pakistani: भारतीय नौदलाने समुद्री चाच्यांच्या तावडीतून १९ पाकिस्तानी नागरिकांसह इराणच्या जहाजाची सुटका केली आहे. २५ तासांत भारतीय नौदलाने अरबी समुद्रात अपहरणाचे दोन मोठे प्रयत्न हाणून पाडले आहेत.
Indian Navy Rescue Operation
Indian Navy Rescue Operation Saam Tv
Published On

Indian Navy Rescue Operation

अरबी समुद्रात भारतीय नौदलानं (Indian Navy) समुद्री चाचांविरोधात पुन्हा मोठी कामगिरी केलीय. भारतीय युद्धनौका आयएनएस सुमित्राने ही कामगिरी बजावली आहे. सोमवारी एडनच्या आखातात सोमाली चाच्यांना चोख प्रत्युत्तर देत १९ पाकिस्तानी नागरिकांसह एका इराणी जहाजाची सुटका केली आहे. (Crime News In Marathi)

सोमालियाच्या चाच्यांनी मासेमारी करणाऱ्यांच्या जहाजाचं अपहरण केलं होतं. रविवारी या जहाजातून इमर्जन्सी कॉल (Indian Navy rescues Pakistani) आला. त्यानंतर तातडीने भारतीय युद्धनौका आयएनएस सुमित्रानं मोहीम सुरू केली. बंधक बनवलेल्या गेलेल्या पाकिस्तानी नागरिकांची सुटका केली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

युद्धनौका आयएनएस सुमित्राने केली मदत

भारतीय नौदलाने (Indian Navy) दिलेल्या माहितीनुसार रविवारी ही मोहीम राबवण्यात आली. आयएनएस सुमित्राने १९ पाकिस्तानी नागरिकांसह एका इराणी जहाजाची सुटका केली. इराणी ध्वज असलेल्या मासेमारी करणाऱ्या एका जहाजाचं सोमालियाच्या समुद्री चाच्यांनी अपहरण केलं. या जहाजवरून मदतीसाठी एमर्जन्सी कॉल करण्यात आला. याची माहिती युद्धनौका आयएनएस सुमित्राला मिळाली. 'अल नैगी' असं या जहाजाचं नाव आहे.

मिळालेल्या माहितीच्या आधारे आयएनएस सुमित्राने यावेळी तातडीने मोहीम राबवली. भारतीय नौदलाच्या मरीन कमांडोंनी १९ पाकिस्तानी नागरिकांसह संपूर्ण जहाजाची (Indian Navy Rescue Operation) सुटका केली. सोमालियाच्या पूर्व किनारपट्टीच्या भागात तैनात भारतीय नौदल युद्धनौका आयएनएस सुमित्राने एकाच दिवसात दुसऱ्यांदा अशी कामगिरी केली आहे.

Indian Navy Rescue Operation
Army Job Scheme: भारतीय सैन्यात अधिकारी होण्याची मोठी संधी, कुठे मिळेल माहिती? कसा कराल अर्ज? जाणून घ्या

भारतीय नौदलाची उल्लेखनीय कामगिरी

भारतीय नौदलाच्या युद्धनौकेने समुद्री चाच्यांनी अपहरण केलेलं इराणी जहाज आणि त्यातील क्रू सदस्यांची सुटका केलीय. याआधी काही तास सोमाली चाच्यांनी आणखी एका इराणी मासेमारी करणाऱ्या जहाजाचं अपहरण केलं होतं. यासाठी देखील भारतीय नौदलानं आयएनएस सुमित्रा युद्धनौकेला त्यांच्या मदतीसाठी पाठवलं होतं.

दोन मोहिमांमध्ये आयएनएस सुमित्राने (Indian warship INS Sumitra) ३६ नागरिकांचे प्राण वाचवले आहेत. यात १७ इराणी आणि १९ पाकिस्तानी नगरिकांचा समावेश आहे. या दोन्ही मोहिमा ३६ तासांपेक्षा कमी वेळात यशस्वीपणे राबविण्यात आल्या आहेत. भारतीय नौदलाची ही अतिशय उल्लेखनीय कामगिरी आहे.

Indian Navy Rescue Operation
Fake Army Offcer Arrest : लष्करी गणवेश, बॅच... लेफ्टनंट असल्याचं तंतोतंत भासवलं; पण एक चूक अन् थेट तुरुंगात रवानगी

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com