Fake Army Offcer Arrest : लष्करी गणवेश, बॅच... लेफ्टनंट असल्याचं तंतोतंत भासवलं; पण एक चूक अन् थेट तुरुंगात रवानगी

Crime News : निरज विक्रम विश्वकर्मा (वय २० वर्ष) असं या तोतया अधिकाऱ्याचं नाव आहे.
Fake Officer
Fake Officer Saam Tv
Published On

अक्षय बडवे

Pune News :

लष्करी अधिकाऱ्याचा गणवेश घालून फिरणाऱ्या तोतयाला पुणे रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. पुणे रेल्वे स्थानकाच्या आवारात लष्करी गणवेशात फिरणारा बनावट लष्कर अधिकारी असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याने लष्करी गणवेशात १५ ऑगस्ट २०२३ रोजी लाल किल्ल्यावर पासाशिवाय प्रवेश केल्याचा धक्कादायक प्रकार देखील समोर आला आहे.

निरज विक्रम विश्वकर्मा (वय २० वर्ष) असं या तोतया अधिकाऱ्याचं नाव आहे. निरज हा उत्तर प्रदेशच्या इटावा येथील रहिवाशी आहे.

Fake Officer
Hemant Parakh News: खळबळजनक! सुप्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक हेमंत पारख यांचे अपहरण; घटनेचा थरार CCTV कॅमेऱ्यात कैद

रेल्वे पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, त्यांनी निरज विश्वकर्मा याच्याकडे चौकशी केली. तेव्हा त्याने आधी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याच्याकडे कोणतेही ओळखपत्र नव्हते. ही चूक त्याला नडली. त्याच्या गणवेशावर नेमप्लेट, पैरा बॅच, लेफ्टनंट असल्याचे बॅच आढळून आले. लष्करी गुप्तचर अधिकाऱ्यांनी त्याच्याकडे चौकशी केल्यावर तो तोतया असल्याचे निष्पन्न झाले.  (Latest Marathi News)

Fake Officer
Sanjay Raut on PM Modi : राजाचं फकिरीचं ढोंग उघडं पडतंय; संजय राऊतांचा 'रोखठोक'मधून PM नरेंद्र मोदींवर निशाणा

अधिक चौकशीमध्ये निरज विश्वकर्मा हा लष्करी अधिकाऱ्याचा गणवेश घालून दिल्ली कॅटोंमेंट परिसरात फिरला. तसेच १५ ऑगस्ट २०२३ रोजी लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले होते. यावेळी त्याने लष्करी गणवेश घालून कोणताही पास नसताना प्रवेश केला होता. तेथे लष्करी अधिकाऱ्यांसोबत भेट देखील घेतली. त्यांच्याबरोबर फोटो काढल्याचेही समोर आले आहे. रेल्वे पोलिसांनी या तोतयाला अटक केली असून अधिक तपास सुरु आहे. (Political News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com