Army Job Scheme: भारतीय सैन्यात अधिकारी होण्याची मोठी संधी, कुठे मिळेल माहिती? कसा कराल अर्ज? जाणून घ्या

Army Job Scheme News: भारतीय सैन्यात थेट अधिकारी होण्याच्या मोठ्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. तरुणांसोबत मलींनाही लष्कराच्या या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.
Army Job Scheme
Army Job SchemeSaam Digital
Published On

Army Job Scheme

भारतीय सैन्यात थेट अधिकारी होण्याच्या मोठ्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. तरुणांसोबत मलींनाही लष्कराच्या या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. एनसीसी विशेष एंट्री स्कीम अंतर्गत एनसीसी कॅडेट्सची थेट भरती भारतीय सैन्यात केली जात असून अंतिम निवड झाली तर सैन्यात लेफ्टनंट पदावर तात्पुरती नियुक्ती मिळणार आहे. नियुक्ती झालेल्या उमेदवाराला ५६ हजार ते पावणे दोन लाखांपर्यंत वेतन मिळणार आहे.

लष्कराच्या या भरतीला ८ जानेवारीपासून अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असून अंतिम मुदत ६ फेब्रुवारीपर्यंत आहे. या भरतीची माहिती https://joinindianarmy.nic.in/ या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. याच संकेस्थवावर इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. ५६व्या एनसीसी स्पेशल एंट्री योजनेंतर्गत ही भरती सुरू आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Army Job Scheme
LG First Transparent Tv: जगातील पहिला ट्रान्सपरन्ट-वायरलेस टीव्ही, एलजीची भन्नाट टेक्नॉलॉजी

एनसीसी स्पेशल एंट्री योजनेंतर्गत सर्विस सिलेक्शन बोर्ड ५ दिवसांची मुलाखत घेतं. मुलाखतीत अनेक फेऱ्या असतात. या दरम्यान अनेक शारीरिक आणि बौद्धीक चाचण्या घेतल्या जातात. प्रयागराज, भोपाळ, बंगळूरू, आणि जालंधरमधील केंद्रांवर या मुलाखीत होतात. मुलाखतीच्या सर्व फेऱ्या झाल्यानंतर अंतिम निकाल जाहीर केला जातो. उमेदवाराची निवड झाल्यानंतर ट्रेनिंग अकादमीमध्ये ४९ आठवड्यांचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. या प्रशिक्षणात उत्तीर्ण झाल्यानंतर लेफ्टनंट पदावर नियुक्ती केली जाणार आहे.

Army Job Scheme
Government Scheme: विद्यार्थ्यांना सरकारकडून मिळतायेत ५१ हजार रुपये, 'या' योजनेतून घ्या आर्थिक लाभ

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com