Ship hijacked with 15 Indian : सोमालियाजवळ जहाजाचं अपहरण, 15 भारतीय अडकले; नौदलाची युद्धनौका सज्ज

Ship hijacked with 15 Indian : अपहरण झालेल्या जहाजाचा शोध घेण्यासाठी कडक पाळत ठेवली जात आहे. गुरुवारी सायंकाळी जहाजाचे अपहरण झाल्याची माहिती मिळाली.
Ship Hijacked
Ship HijackedSaam Tv
Published On

Ship hijacked News :

सोमालियाजवळ एका जहाजाचे अपहरण करण्यात आले असून त्यात १५ भारतीय क्रू मेंबर्स आहेत. एमव्ही लीला नॉरफोक असं या नावाच्या या जहाजाचं नाव आहे. सोमालियाच्या सागरी सीमेजवळ या जहाजाचं अपहरण करण्यात आले आहे. अपहरणाची माहिती मिळाल्यानंतर भारतीय नौदल सक्रिय झाले आहे.

नौदलाने आपली एक युद्धनौका आयएनएस चेन्नई अपहरण झालेल्या जहाजाच्या दिशेने पाठवली आहे. नौदलाने दिलेल्या माहितीनुसार, आम्ही कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार आहोत. अपहरण झालेल्या जहाजाचा शोध घेण्यासाठी कडक पाळत ठेवली जात आहे. गुरुवारी सायंकाळी जहाजाचे अपहरण झाल्याची माहिती मिळाली. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Ship Hijacked
Attack on ED Team West Bengal : आधी घेरलं मग विटा, दगडांनी कारची तोडफोड; धाड टाकण्यासाठी निघालेल्या EDच्या पथकावर बंगालमध्ये हल्ला

सोमालियाच्या किनाऱ्यावर अपहरण करण्यात आलेल्या या जहाजावर लायबेरियाचा ध्वज आहे. भारतीय नौदलाची विमाने या जहाजावर सतत लक्ष ठेवून आहेत. क्रू मेंबरशी संवाद देखील झाला आहे. जहाजातील सर्व क्रू मेंबर्स सुरक्षित आहेत, असं भारतीय नौदलाने सांगितलं आहे.

Ship Hijacked
Jharkhand News: रात्रीच्या वेळी विहिरीतून येत होता गूढ आवाज, गावकऱ्यांनी आत डोकाऊन पाहिलं तर बसला धक्का...

जहाजांवरील हल्ले वाढले

लाल समुद्रात, इराण समर्थित हुथी बंडखोर व्यावसायिक जहाजांना सतत लक्ष्य करत आहेत. गेल्या एका महिन्यात, हुथी बंडखोरांनी सुमारे 25 वेळा व्यापारी जहाजांवर हल्ले केले आहेत. हुथी बंडखोर पॅलेस्टाईनच्या समर्थनार्थ हे हल्ले करत आहेत.

याशिवाय समुद्री दरोडेखोरांचाही धोका कायम आहे. अमेरिका आणि भारतासह अनेक देशांचे नौदल अरबी समुद्रातील आंतरराष्ट्रीय जहाज मार्गांचे संरक्षण करत आहेत. भारतीय नौदलानेही आपल्या पाच युद्धनौका अरबी समुद्र आणि लाल समुद्रात तैनात केल्या आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com