पश्चिम बंगालमधून एक मोठी बातमी समोर येत आहे . अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीच्या पथकावर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. छापा टाकण्यासाठी ईडीची वाहने उत्तर 24 परगणा येथे पोहोचली होती. तेव्हा गावकऱ्यांनी त्यांना चारही बाजूंनी घेरले आणि टीमवर हल्ला केला. दरम्यान ईडीच्या आणखी एका पथकाने टीएमसी नेते आणि माजी अध्यक्षांच्या घरावर छापा टाकला आहे.
रेशन घोटाळा प्रकरणात तपास यंत्रणेचे पथक शुक्रवारी उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील संदेशखली गावात पोहोचले होते. टीएमसी नेते शाहजहान शेख यांच्या घरावर छापा टाकण्यासाठी ईडीचे अधिकारी आले होते. त्यांच्यासोबत केंद्रीय सुरक्षा दलाचे कर्मचारीही उपस्थित होते. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
मात्र गावात ईडीची वाहने पाहून गावातील 200 हून अधिक लोक जमा झाले आणि त्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. ग्रामस्थांनी ईडी आणि सुरक्षा दलाच्या वाहनांची तोडफोड केली. जमावाने ईडीच्या सहाय्यक संचालकांची गाडीही सोडली नसल्याचे सांगण्यात येत आहे.
रेशन घोटाळ्याप्रकरणी माजी पालिका अध्यक्ष आणि तृणमूल काँग्रेसचे नेते शंकर आध्ये यांच्या घरावर हा छापा टाकण्यात येत आहे. मात्र येथे ईडीची कारवाई शांततेत सुरू आहे.
रेशन घोटाळ्याप्रकरणी ईडीची कारवाई गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. पश्चिम बंगालमधील लाभार्थ्यांना दिलेले रेशन बाजारात विकले जात होते, असे तपास यंत्रणेचे म्हणणे आहे. गिरणी मालक आणि वितरकांनी मिळून सुमारे 30 टक्के रेशन विकले गेले आहे. या प्रकरणी ईडीने आतापर्यंत अनेक छापे टाकले असून एका गिरणी मालकालाही अटक केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.