India Pakistan War Marathi News : भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्याही क्षणी युद्धाला सुरूवात होऊ शकते. कारण पाकिस्तानच्या हल्ल्याला भारताने चोख प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानने जम्मू काश्मीर आणि राजस्थानमध्ये ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याचा प्रयत्न केला, पण भारतीय वायू सेनेने हा पाकिस्तानचा प्रयत्न हाणून पाडलाय. पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने आता नौदलाला मैदानात उतरवले आहे. भारताचे सर्वात शक्तीशाली आयएनएस विक्रांत अरबी समुद्रात उतरले आहे. आयएनएस विक्रांतवरून भारताच्या फायटर जेट आणि ड्रोनने पाकिस्तानमध्ये हल्ला केला आहे. भारताने कराचीवर थेट हल्ला केला आहे.
हवाई, जमीनीवरून हल्ला केल्यानंतर आता भारताचे नौदल सक्रिय झाले. अरबी समुद्रात तैनात असलेल्या आयएनएस विक्रांतने कराचीवर हल्ला केलाय. नौदलाच्या हल्ल्यामुळे कराची बंदरासह शहरात मोठी आग लागली आहे. कराची आणि ओरमारा बंदरांवर आयएनएस विक्रांतवरून क्षेपणास्त्रे आणि मिसाईल डागण्यात आल्या आहेत. भारताच्या हल्ल्यामुळे दोन्ही बंदारावर मोठ्या प्रमाणात नुकसान झालेय. पाकिस्तानची लढाऊ जहाजांचेही नुकसान झालेले असू शकते. भारताच्या हल्ल्यानंतर दोन्ही बंदरवरून शहरांमध्ये धुराचे लोट पसरले आहेत. लोक घाबरून सैरवैर पळत आहेत.
कराची बंदरगाहावर हल्ला
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटो आणि माहितीनुसार, INS विक्रांतने कराची बंदरगाहावर मिसाइल डागल्या आहेत. त्यामुळे बंदरगाह आणि आसपासच्या भागात मोठी आग लागली. यामुळे पाकिस्तानच्या नौदलाला आणि व्यापारी जहाजांना मोठा फटका बसला आहे. काही पोस्ट्सनुसार, कराचीतील रस्त्यांवर गोंधळ आणि हाहाकार माजला आहे. संपूर्ण पाकिस्तानात वीजपुरवठा खंडित झाला आहे.
पाकिस्तानी नौदलाचे कराची आणि ओरमारा येथे प्रमुख तळ आहेत, जिथे त्यांचे उच्च नौदल अधिकारी, युद्धनौका, पाणबुड्या आणि सामरिक मुख्यालय स्थित आहेत. INS विक्रांतने या तळांवर अचूक मिसाइल हल्ले करून पाकिस्तानी नौदलाच्या रणनीतीला मोठा धक्का दिला आहे
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.