संसदेत ऑपरेशन सिंदूरवर चर्चा, तिकडे काश्मीरमध्ये ऑपरेशन महादेव; पहलगाम हल्ल्याचा बदला, मास्टरमाइंडचा खात्मा

Operation Mahadev : एकीकडं भारताच्या संसदेत ऑपरेशन सिंदूरवर चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडं भारताच्या लष्करानं ऑपरेशन महादेव राबवून पहलगाम हल्ल्याचा एकप्रकारे बदला घेतला. सूत्रांच्या माहितीनुसार, पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड हाशिम मूसाचा जवानांनी खात्मा केला. याबाबत अद्याप लष्कराकडून अधिकृत माहिती मिळालेली नाही.
Jammu Kashmir Shrinagar operation Mahadev Hashim Moosa
Jammu Kashmir Shrinagar operation Mahadev Hashim Moosasocial media
Published On
Summary
  • भारतीय लष्कराच्या चिनार कॉर्प्सनं राबवलं ऑपरेशन महादेव

  • जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई

  • चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा

  • पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड हाशिम मूसा देखील ठार

पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं दहशतवादविरोधी मोहीम तीव्र करताना ऑपरेशन सिंदूरमध्ये जवळपास १०० दहशतवाद्यांना ठार केलं. याच ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या अधिवेशनात चर्चा सुरू आहे. दुसरीकडं लष्करानं जम्मू-काश्मीरमध्ये ऑपरेशन महादेव राबवून तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. यात पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि २० लाखांचं बक्षीस असलेला लश्कर ए तोयबाचा कमांडर हाशिम मुसालाही ठार केलं, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात येत आहे. याबाबत अद्याप लष्कराकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

भारतीय लष्कराच्या दहशतवादविरोधी मोहिमेला जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात मोठं यश मिळालं आहे. भारतीय लष्कराचे जवान, जम्मू-काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफ यांनी संयुक्तरित्या चालवलेल्या ऑपरेशन महादेव अंतर्गत कारवाई करताना तीन दहशतवाद्यांना ठार केलं. त्यात पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड हाशिम मूसाचाही समावेश आहे. दोन दिवस हे ऑपरेशन चाललं. सोमवारी या मोहिमेला यश मिळालं. दुर्गम आणि डोंगराळ भागात केलेल्या कारवाईत कुख्यात दहशतवाद्यांचा खात्मा करत सुरक्षा दलांनी पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला.

ऑपरेशन महादेव कुठे आणि कसं चाललं?

लष्कराच्या चिनार कॉर्प्सने ऑपरेशन महादेव राबवलं. जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील लिडवास परिसरात शोधमोहीम हाती घेतली. दुर्गम आणि डोंगराळ भाग आहे. त्या ठिकाणी दहशतवाद्यांनी तात्पुरत्या स्वरुपात बंकर तयार केले होते. सूत्रांच्या माहितीनुसार, दोन दिवस आधीच दाचीगामच्या जंगलात दहशतवाद्यांच्या हालचालींबाबत माहिती मिळाली होती. पहलगाम हल्ल्याशी संबंधित मॉड्युलचे दहशतवादी असू शकतात, अशी माहिती हाती लागली होती. त्यानंतर हे ऑपरेशन महादेव राबवण्यात आलं.

सलग दोन दिवस मोहीम

दहशतवाद्यांची संभाव्य ठिकाणांची खात्रीशीर माहिती मिळवण्यासाठी स्थानिक बकरवाल समूह आणि गस्तीवर असलेल्या युनिट्सकडून मदत घेण्यात आली. त्यानंतर परिसरात २४ राष्ट्रीय रायफल्स आणि ४ पॅराच्या स्पेशल युनिट्सला तैनात करण्यात आलं. सलग दोन दिवस शोधमोहीम सुरू होती. अखेर सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास दहशतवाद्यांशी चकमक झाली.

सुरक्षा दलाच्या जवानांनी तीन दहशतवाद्यांना घेराव घातला. दहशतवाद्यांकडून गोळीबार सुरू झाला. त्याला जवानांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले. तब्बल एक तास ही चकमक सुरू होती अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली. साधारण एका तासाभरानंतर ड्रोन फुटेजच्या माध्यमातून तीन दहशतवाद्यांना टिपल्याची खात्री पटली. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांमध्ये हाशिम मूसा देखील होता. त्याच्यावर २० लाखांचं बक्षीस आहे. तो लश्कर ए तोयबाचा टॉप कमांडर होता.

Jammu Kashmir Shrinagar operation Mahadev Hashim Moosa
ऑपरेशन सिंदूरवर आज चर्चा, अधिवेशन तापणार; सत्ताधारी-विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी होणार | Operation Sindoor

कोण होता हाशिम मूसा?

हाशिम मूसा हा लश्कर ए तोयबा आणि जैश ए मोहम्मदच्या संयुक्त मॉड्युलचा भाग होता. २२ एप्रिल २०२५ रोजी पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तो मुख्य सूत्रधार होता. याच हल्ल्यात २६ निष्पाप पर्यटकांची हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर राष्ट्रीय तपास यंत्रणांनी त्याच्यावर २० लाखांचं बक्षीस जाहीर केलं होतं.

ऑपरेशन सिंदूरनंतरचं मोठं यश

पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पीओकेमधील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते. त्यात जवळपास १०० दहशतवादी मारले गेले होते. आता ऑपरेशन महादेव अंतर्गत लष्करानं केलेल्या कारवाईत पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाइंडसह तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, ऑपरेशन महादेव अद्याप थांबलेले नाही. याच परिसरात लपून बसलेल्या उर्वरित दोन ते चार दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे. लिडवास आणि आजूबाजूच्या जंगल परिसरात ही शोध मोहीम सुरूच आहे.

Jammu Kashmir Shrinagar operation Mahadev Hashim Moosa
Operation Mahadev : ऑपरेशन महादेव हे नाव कसं पडलं? जाणून घ्या संपूर्ण माहिती
Q

ऑपरेशन महादेव कोणी राबवलं?

A

भारतीय लष्करानं दहशतवादविरोधात ऑपरेशन महादेव ही मोहीम हाती घेतली. त्यात पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड हाशिम मूसाला कंठस्नान घालण्यात आलं.

Q

हाशिम मूसा कोण?

A

हाशिम मूसा हा लश्कर ए तोयबा आणि जैश ए मोहम्मदच्या संयुक्त मॉड्युलचा टॉप कमांडर आणि पहलगाम हल्ल्याचा मुख्य सूत्रधार होता.

Q

ऑपरेशन महादेव कुठे राबवण्यात आलं?

A

जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील लिडवास परिसरात हे ऑपरेशन राबवण्यात आलं.

Q

हाशिम मूसावर किती बक्षीस होतं?

A

पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड हाशिम मूसावर २० लाखांचं बक्षीस ठेवण्यात आलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com