Weather Update : १३ राज्यांना पाऊस झोडपणार; विजांच्या कडकडाटासह ७० किमी वेगाने वारे वाहणार; महाराष्ट्रात कसं असेल हवामान? वाचा

Weather Update Today News : देशातील १३ राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ४ नोव्हेंबरपर्यंत अनेक भागांत पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रात मुंबईसह कोकणात उष्ण व दमट हवामान राहण्याची शक्यता आहे.
Weather Update News
Weather Update News AI image
Published On: 
Summary
  • देशातील १३ राज्यांसाठी मुसळधार पावसाचा इशारा

  • काही भागांत ४ नोव्हेंबरपर्यंत पावसाची शक्यता

  • दक्षिण भारतातील काही राज्यांमध्ये २३ ते २८ ऑक्टोबरदरम्यान पावसाच्या हालचाली

  • पावसादरम्यान विजांचा कडकडाट आणि ताशी ४० ते ७० किलोमीटर वेगाने वारे

देशाच्या विविध भागात हवामान बदलताना पाहायला मिळत आहे. कुठे पाऊस तर कुठे उन्हाचा चटका बसत आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, अनेक राज्यांमधून मौसमी वाऱ्यांनी माघार घेतली असली तरी,काही ठिकाणी पावसाला पोषक हवामान तयार होत आहे. तसेच ४ नोव्हेंबरपर्यंत देशातील काही भागांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून, आज १३ राज्यांसाठी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पावसासोबतच विजांचा कडकडाट आणि वादळी वारे वाहण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पावसादरम्यान वाऱ्यांचा वेग ताशी 40 ते 70 किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो. काही ठिकाणी मेघगर्जनेसह वीज पडण्याची शक्यता आहे. दक्षिण भारतातील राज्यांमध्ये 23 ते 28 ऑक्टोबर या कालावधीत पावसाच्या हालचाली अधिक सक्रिय राहण्याची शक्यता आहे.

Weather Update News
Sleep Health : अंतर्वस्त्रे न घालता रात्री झोपणं खरंच फायदेशीर आहे का?

तमिळनाडू, केरळ आणि आंध्र प्रदेशसह पुद्दुचेरी, अंदमान-निकोबार बेटे आणि लक्षद्वीप परिसरात पावसाचा प्रभाव जाणवू शकतो. काही भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात विकसित होत असलेल्या हवामान प्रणालीमुळे पावसाच्या परिस्थितीत आणखी बदल होऊ शकतात. ही प्रणाली अधिक तीव्र झाल्यास काही भागांतील पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

Weather Update News
Potato Peels : बटाटा सोलून साली फेकून देता? 'असा' करा वापर, ८ दिवसांत दिसेल चमत्कार

महाराष्ट्रात गेले २ दिवस कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये रिमझिम पावसाने हजेरी लावली. मात्र आज कोकणात उष्ण व दमट हवामान राहण्याची शक्यता असून मुंबईसह अनेक शहरांमध्ये तापमानाचा पारा अधिक वाढला आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com