
Pakistan on High Alert After Modi's Military Directive : पहलगाम हल्ल्यानंतर भारताकडून पाकिस्तानला सडेतोर प्रत्युत्तर देण्यात येतेय. सिंधू करार रद्द करत वॉटर स्टाइक तर केलाच, पण त्यानंतरही भारताने कठोर कारवाईसाठी तयारी सुरू केली आहे. भारताकडून कोणत्याही क्षणाला हल्ला होऊ शकतो, याची भीती पाकिस्तानला लागली आहे. भारताकडून हल्ला होईल, त्या भितीने पाकिस्तानची झोप उडाली आहे. पाकिस्तानकडून आपल्या हवाई दलावा सतर्क राहण्याच्या सूचा देण्यात आल्या आहेत. त्याशिवाय सीमेवर संरक्षण यंत्रणा तैनात करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
२२ एप्रिल रोजी जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला होता. त्या हल्ल्यात २८ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर कठोर कारवाईचा इशारा दिला. पाकिस्तानने भारताच्या हल्ल्याच्या भीतीने आपले हवाई दलाला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याशिवाय सीमेवर संरक्षण यंत्रणा आणि तोफखाना तैनात केला आहे.
सीमेवर पाकिस्तानी सैन्याच्या हालचालींची माहिती समोर आली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी एका उच्चस्तरीय बैठकीत सशस्त्र दलांना दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी कारवाईचे स्थान, लक्ष्य आणि वेळ ठरवण्याचे स्वातंत्र्य दिले. त्यानंतर पाकिस्तानमध्येही हालचाली सुरू झाल्या आहे. सूत्रांनुसार, पाकिस्तानने सियालकोट आणि लाहोरजवळील क्षेत्रात रडार यंत्रणा मजबूत केल्या आहेत. फिरोजपूर सेक्टरमध्ये इलेक्ट्रॉनिक युद्ध यंत्रणा सक्रिय केली आहे. याशिवाय, पाकिस्तान-व्याप्त काश्मीर (PoK) मध्ये अतिरिक्त सैन्य आणि तोफखाना तैनात करण्यात आला.
पाकिस्तानचे सूचना आणि प्रसारण मंत्री अताउल्लाह तरार यांनी मंगळवारी मध्यरात्री २ वाजता पत्रकार परिषद घेऊन भारत हल्ला करणार असल्याचा दावा केला. त्यांनी म्हटले की, भारत पुढील २४ ते ३६ तासांत सैन्य कारवाई करू शकतो याबाबत आम्हाला विश्वसनीय गुप्तचराकडून माहिती मिळाली आहे. भारत पहलगाम हल्ल्याचा खोटा बहाना करून पाकिस्तानवर हल्ला करू शकतो. तरार यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला सतर्क राहण्याचे आवाहन केले. भारताच्या कोणत्याही हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यास आम्ही सज्ज असल्याचेही त्यांनी म्हटले. दरम्यान, भारताने पहलगाम हल्ल्यासाठी पाकिस्तानला जबाबदार ठरवले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या तिन्ही सैन्यदलांना स्वातंत्र्य दिले. वेळ आणि ठिकाण तुम्ही ठरवा असे मोदींनी सैन्यदालाच्या प्रमुखांना सांगितलेय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.