
पहलगाम दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तान कनेक्शन समोर आलं आणि जगभरात पाकिस्तानविरोधात संतापाची लाट उसळलीय. त्यातच आता भारताने युएनच्या व्यासपीठावरुन पाकड्यांचा बुरखा टराटरा फाडलाय.. त्यामुळे दहशतवाद्यांना पोसणाऱ्या पाकड्यांचा खरा चेहरा जगासमोर उघड झालाय.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. तर पाकिस्तानमधील लष्कर ए तैयबाची उपशाखा असलेल्या टीआरएफने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली.. त्यामुळे या हल्ल्याचं थेट पाक कनेक्शन समोर आलंय. त्यामुळे भारताने पाकड्यांची कायदेशीर नाकेबंदी सुरु केलीय.. दरम्यान पाकिस्तान दहशतवाद्यांची फॅक्टरी असल्याची कबुली पाकड्यांचे संरक्षणमंत्री ख्वाजा असिफने दिलीय.
खुद्द पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यानेच दहशतवादाबाबत कबुली दिल्याने भारताच्या हाती आयतं कोलित मिळालंय. त्यामुळेच भारताच्या प्रतिनिधी योजना पटेल यांनी पाकड्यांची पोलखोल केलीय. त्यांनी पाकड्यांना दमात्र याआधीही भारताने आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरुन पाकड्यांना कसं उघडं पाडलं होतं? पाहूयात.
डिसेंबर 2008
मुंबई हल्ल्यामागे पाकिस्तानी दहशतवादी संघटनेचा हात असल्याची टीका
2016
उरी हल्ल्यानंतर पाकिस्तान दहशतवादाचा केंद्रबिंदू असल्याची टीका
2019
पुलवामा हल्ल्यात पाकड्यांच्या जैशचा हात असल्याचे पुरावे सादर
2024
जम्मू काश्मीरमधील दहशतवाद रोखण्यासाठी टीआरएफवर बंदीची मागणी
आता पाकड्यांचा बुरखा आणि त्यांचे नापाक इरादे जगासमोर आल्याने वर्ल्ड बँक, आयएमएफ, युनायटेड नेशन्सची सुरक्षा परिषद पाकड्यांवर कोणते निर्बंध घालणार आणि पाकड्यांना सगळ्याच बाजूने कसं ऑलआऊट केलं जाणार? याकडे लक्ष लागलंय. मात्र भारतानेही दहशतवाद्यांना पाठबळ देणाऱ्या पाकड्यांच्या नांग्या ठेचण्याची गरज आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.