ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा प्रतिहल्ला, पुंछमध्ये भारतीय सैन्याच्या कॅम्पवर बॉम्बहल्ला | Operation Sindoor

Pakistans Bomb Attack on CRPF Camp: भारतीय सैन्यांनी पाकिस्तानमध्ये घुसून ९ दहशतवाद्यांचे तळ उद्धवस्त केले आहेत. मात्र, आता पाकिस्तानही प्रतिहल्ल्याच्या तयारीत असल्याचं दिसून येत आहे.
Operation Sindoor
Operation SindoorSaam TV News
Published On

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीयांच्या मनात बदलेची आग धगधगत होती. भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानच्या नांग्या ठेचल्या आहेत. भारतीय सैन्याने पाकिस्तानमध्ये घुसून ९ दहशतवाद्यांचे तळ उद्धवस्त केले आहेत. मात्र, आता पाकिस्तान देखील प्रहार करण्याच्या तयारीत आहे.

पाकिस्तानी सैन्यांनी नियंत्रण रेषेवर जोरदार गोळीबार केला असून, जम्मूच्या पूँछ भागातही सीआरपीएफच्या तुकडीवर बॉम्बहल्ला केला आहे. या हल्ल्यात भारतीय सैनिक गंभीर जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे.

सीआरपीएफ कॅम्पवर बॉम्ब हल्ला

जम्मूच्या पूँछ भागात पाकिस्तानकडून सीआरपीएफ कॅम्पवर बॉम्ब हल्ला करण्यात आला आहे. या बॉम्ब हल्ल्यात भारतीय सैनिक गंभीर जखमी झाले आहेत. हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घालून शोधमोहीम सुरू केली आहे. सध्या अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

Operation Sindoor
Naxalite Encounter: ऑपरेशन सिंदूरनंतर सुरक्षा दलाकडून मोठी कारवाई, करेगुट्टामध्ये २२ नक्षलवाद्यांचा खात्मा

नियंत्रण रेषेवर गोळीबार

ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर जोरदार गोळीबार केल्याची माहिती समोर आलेली आहे. या गोळीबारात १० जणांचा मृत्यू झाला आहे तर, ३८ जण गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यानंतर भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे.

Operation Sindoor
IND v/s PAK: "अभी पिक्चर बाकी है…"; Operation Sindoor नंतर भारत आणखी एक ऑपरेशन राबवणार?

शाळा शैक्षणिक संस्था बंद

या हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमधील शाळा आणि शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात आल्या आहेत. तसेच पहलगाम हल्ल्यानंतर तेथील नागरिक देखील दहशतीच्या छायेखाली राहत आहेत.

Operation Sindoor
ऑपरेशन सिंदूर कसं राबवलं? पाकिस्तानच्या नांग्या कशा ठेचल्या? अभ्यासकांनी दिली इत्यंभूत माहिती | Operation Sindoor

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com