India-Pakistan War : जैशची घुसखोरी हाणून पाडली, बीएसएफने ७ दहशतवाद्यांचा केला खात्मा

India Pakistan Attack News in marathi : रात्रीच्या अंधारात भारतामध्ये घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या सात दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. सीमारेषावर सध्या ताणवाची स्थिती आहे.
India-Pakistan War
India-Pakistan WarSaam Tv News
Published On

India Pakistan Attack News Live : भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सध्या तणावाचे वातवरण आहे. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने ऑफरेशन सिंदूर राबवले. भारताने १०० पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव अधिक शिगेला पोहचलाय. पाकिस्तानमधून काही दहशतवाद्यांनी भारतात घुसण्याचा प्रयत्न केला. सांबा सेक्टरमध्ये दहशतवाद्यांनी भारताच्या हद्दीत प्रयत्न केला, त्यावेळी भारतीय जवानांकडून प्रत्युत्तर देण्यात आले. भारताने सात दहशतवाद्यांचा खात्मा केल्याचं समजतेय.

जम्मू काश्मीरमधील सांबा सेक्टरमध्ये रात्री ११ वाजता अंधाराचा फायदा घेत दहशतवाद्यांनी भारतात घुसण्याचा प्रयत्न केला. दहशतवाद्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला. बीएएसएफ आणि दहशतवाद्यांमध्ये चममक झाली. बीएसएफने दहशतवाद्यांना अद्दल घडवली. भारताने सात दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सांबा सेक्टरमध्ये रात्री ११ ते १२ वाजण्याच्या दरम्यान १० - १३ जैशच्या दहशतवाद्यांनी भारतात घुसण्याचा प्रयत्न केला होता. बीएसएफकडून जोरदार हल्ला करत हा प्रयत्न हाणून पाडला. भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार झाला. भारताने पाकिस्तानच्या सात दहशतवाद्यांचा खात्मा केला.

India-Pakistan War
Operation Sindoor: मसूद अजहर ढसाढसा रडला! घराबाहेर मृतदेहांच्या रांगा; ऑपरेशन सिंदूरमध्ये कुटुंबातील १४ जण ठार| VIDEO

पठाणकोटमध्ये भारतीय हवाई दलाने पाकड्यांचे विमान पाडले

भारतीय हवाई दलाने पठाणकोट सेक्टरमध्ये पाकिस्तानी हवाई दलाचे (PAF) एक लढाऊ विमान पाडले. भारत-पाकिस्तानमधील तणाव आणखी तीव्र झाला आहे. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर केलेल्या हल्ल्यांच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानने जम्मू आणि पंजाबमधील अनेक ठिकाणांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले करण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यांना भारतीय हवाई संरक्षण यंत्रणेने S-400 यंत्रणेच्या साहाय्याने, यशस्वीपणे तोंड दिले. सूत्रांनुसार, पठाणकोट येथे पाडले गेलेले विमान F-16 होते, तर काही दाव्यांमध्ये JF-17 विमानांचाही उल्लेख आहे. भारताने पाकिस्तानचे दोन पायलटही पकडले आहेत.

India-Pakistan War
Operation Sindoor : भारताच्या ऑपरेशन 'सिंदूर'मुळे अमेरिकेची चिंता वाढली, पाकिस्तानात राहणाऱ्या अमेरिकन नागरिकांना लाहोर सोडण्याची सूचना

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com