India Pakistan Attack LIVE : जम्मू, सांबा आणि पठाणकोटमध्ये पाककडून ड्रोन हल्ला

India Pakistan Attack LIVE Updates air strick batmya : भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाची स्थिती निर्माण झाली आहे. भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. भारताने हा हल्ला हाणून पाडला असून भारताने प्रत्युत्तर करण्यात येत आहे.
India Pakistan Attack LIVE news ind vs pak tension war news total deaths and injured number check all air strike batmya
India Pakistan Attack LIVE news ind vs pak tension war news total deaths and injured number check all air strike batmyaSaam TV News

जम्मू, सांबा आणि पठाणकोटमध्ये पाककडून ड्रोन हल्ला

जम्मू, सांबा आणि पठाणकोटमध्ये पाककडून ड्रोन हल्ला

जैसलमेरमध्ये पाककडून पुन्हा ड्रोन हल्ला, भारताने पाडले ड्रोन्स

उरीमध्येमध्ये फायरिंग

India Pakistan Attack LIVE :  पाकिस्तानकडून धार्मिक स्थळांना लक्ष

नियंत्रण रेषेवर (LoC) शाळा आणि धार्मिक स्थळांना पाकिस्तानकडून लक्ष्य करण्यात आले. सात आणि आठ मे रोजी पाकिस्तानकडून भारताच्या हद्दीत ड्रोन आणि मिसाईल हल्ला केला. पाकिस्तानकडून पुंछ येथे केलेला गोळीबार ख्रिस्त स्कूलवर पडला. या हल्ल्यात शाळेतील दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. गोळीबारादरम्यान शाळेतील अनेक कर्मचारी आणि स्थानिकांनी शाळेच्या भूमिगत सभागृहात आश्रय घेतला. सुदैवाने शाळा बंद होती, अन्यथा अधिक नुकसान झाले असते. पाकिस्तान याच हेतूने गुरुद्वारे, चर्च आणि मंदिरांसह पूजास्थळांना लक्ष्य करत आहे. ही पाकिस्तानची नवी नीच पातळी आहे.
विक्रम मिश्री, परराष्ट्र सचिव

India Pakistan Attack LIVE : कराची-लाहोर मार्गावर पाकिस्तानात नागरी विमाने उडत होती

भारताने हवाई क्षेत्र बंद केल्याने भारतीय बाजूला नागरी विमान वाहतूक पूर्णपणे थांबली, परंतु कराची-लाहोर मार्गावर पाकिस्तानात नागरी विमाने उडत होती. भारतीय हवाई दलाने संयम दाखवून आंतरराष्ट्रीय नागरी वाहकांची सुरक्षितता सुनिश्चित केली.
विंग कमांडर व्योमिका सिंग

India Pakistan Attack LIVE : अयशस्वी ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ला केला.

पाकिस्तानने ७ मे रोजी सायंकाळी साडे आठ वाजता अयशस्वी ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ला केला. तरीही त्यांनी नागरी हवाई क्षेत्र बंद केले नाही. भारतावरच्या हल्ल्याला त्वरित हवाई प्रत्युत्तर मिळेल हे माहीत असूनही पाकिस्तान नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर करत आहे. भारतीय हवाई दलाने संयम दाखवला, आंतरराष्ट्रीय नागरी वाहकांच्या सुरक्षिततेची खात्री केली.
विंग कमांडर व्योमिका सिंग

India Pakistan Attack LIVE : पाकिस्तानने भ्याड हल्लानाकारणे दुटप्पीपणाचे उदाहरण

पाकिस्तानने काल रात्री केलेल्या या भ्याड हल्ल्याचा हेतू भारतीय शहरं, नागरी पायाभूत सुविधा आणि सैन्य आस्थापनांना लक्ष्य करण्याचा होता. भारतीय सैन्याने जबाबदारीने प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानने केलेल्या या हल्ल्यांचे अधिकृत आणि स्पष्टपणे खोटे नाकारणे, हे त्यांच्या दुटप्पीपणाचे उदाहरण आहे, असे परराष्ट्र सचिव विक्रम मिश्री म्हणाले.

India Pakistan Attack LIVE : पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला

पाकिस्तानी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानातील चार हवाई संरक्षण ठिकाणांवर सशस्त्र ड्रोन हल्ले केले. एका ड्रोनने हवाई संरक्षण रडार उद्ध्वस्त केले. पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर मोठ्या क्षमतेच्या तोफांनी आणि सशस्त्र ड्रोनद्वारे गोळीबार केला, यात भारतीय सैन्याला काही नुकसान आणि जखमी झाली. भारतीय प्रत्युत्तरात पाकिस्तानी सैन्याचेही मोठे नुकसान झाले.
व्योमिका सिंग, विंग कमांडर

India Vs Pakistan: भारत-पाकिस्तानमधील तणाव वाढला 

India Vs Pakistan: भारत-पाकिस्तानमधील तणाव वाढलाय. भारतीय लष्कराकडून थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेतली जाणार आहे.

India Pakistan Attack LIVE : जैसलमेरमधील बाजार ५ वाजता बंद होणार

१५ मेपर्यंत फटाके फोडू नका, ड्रोनवरही बंदी; गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांचे आवाहन

१५ मेपर्यंत फटाके फोडू नका, ड्रोनवरही बंदी; गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांचे आवाहन

- गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांचे आवाहन

- या महिन्याच्या १५ तारखेपर्यंत गुजरातमध्ये कोणत्याही कार्यक्रमात फटाके फोडण्यास बंद

- ड्रोन उडवण्यास देखील परवानगी नाही.

- कृपया सहकार्य करा आणि निर्देशांचे पालन करा.

India Vs Pakistan: भारत-पाकिस्तानमधील तणाव वाढला, देशातील सर्व एअरपोर्टवर अलर्ट जारी

देशातील एअरपोर्टवर अलर्ट जारी

भारत -पाकिस्तानमधील तणाव वाढला.

देशातील सर्वच एअरपोर्टवर अलक्ट जारी करण्यात आले.

गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेमध्ये आज देशात सुरक्षा वाढवण्याबाबत पाऊल उचलण्यात आले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला राज्यातील सुरक्षा, सज्जतेचा आढावा

भारत आणि पाकिस्तानातील तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पोलिस आणि प्रशासकीय यंत्रणेकडून राज्यातील एकूणच सुरक्षा आणि सज्जतेचा आढावा घेतला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी उपस्थित होते.

मॉकड्रिल, ब्लॅकआऊट इत्यादी सर्वच बाबतीत समग्र आढावा घेताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी विविध दिशानिर्देश दिले. प्रभारी मुख्य सचिव राजेशकुमार, राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबई पोलिस आयुक्त देवेन भारती, मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी, नागरी सुरक्षाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक प्रभातकुमार, गृहविभागाच्या प्रधान सचिव राधिका रस्तोगी, गुप्तवार्ता विभागाचे अतिरिक्त पोलिस महानिरीक्षक शिरीष जैन, मुंबई आणि मुंबई उपनगर जिल्हाधिकारी उपस्थित होते.

India Pakistan Attack LIVE : आठवडाभरासाठी आयपीएल स्थगित

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावाच्या वातावरणात आयपीएल स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. थोड्याच दिवसात नवीन वेळापत्रक आणि ठिकाणाची घोषणा केली जाणार आहे.

India Pakistan Attack LIVE :थोड्याच वेळात इंडियन आर्मीची पत्रकार परिषद

भारत पाकिस्तान यांच्यातील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर थोड्याच वेळात इंडियन आर्मीची पत्रकार परिषद होणार आहे. साडेपाच वाजता देशाला संबोधित करण्यात येणार आहे.

Delhi News: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा लखनौ दौरा पुढे ढकलला

भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा लखनौ दौरा पुढे ढकलला

संरक्षणमंत्र्यांनी आज तिन्ही लष्कर प्रमुखांसोबत बैठकही घेतली

Delhi News: भारत- पाकिस्तानमधील तणाव वाढला, दिल्लीत सुरक्षा व्यवस्थेत वाढ

भारत- पाकिस्तानमधील तणाव वाढला, दिल्लीत सुरक्षा व्यवस्थेत वाढ

भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढल्यानंतर शुक्रवारी दिल्लीतील महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली.

सरकारी इमारती, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, जलशुद्धीकरण प्रकल्प, न्यायालये आणि परदेशी दूतावासांसह सर्व महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

पोलिसांनी बाजारपेठ, रेल्वे स्थानके, मॉल, उद्याने आणि मेट्रो स्थानके यासारख्या जास्त रहदारी असलेल्या भागात सुरक्षा व्यवस्था वाढवली.

दहशतवाद्यांना सोडणार नाही- शिवराज सिंह चौहान

भारत पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण आहे. भारताच्या सीमेवर हल्ले होत आहे. याचदरम्यान, आम्ही दहशतवाद्यांना सोडणार नाही, असं शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे.

Delhi: दिल्लीत आज सायरन वाजणार

दिल्लीत आज दुपारी ३.०० वाजत सायरन टेस्टिंग होणार आहे. यासाठी सर्वजण तयार आहे. नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी सायरन वाजवले जाणार आहे.

ATM सेवा सुरळीत सुरु

भारत-पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर अनेक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एटीएम सेवा बंद होणार असल्याचा मेसेज व्हायरल होत होता. मात्र, एटीएम सेवा पूर्णपणे सुरळीत सुरु असल्याचे आता सांगितले आहे.

RSS ने भारतीय सैन्याचे केले अभिनंदन

RSS ने ट्विट करत भारतीय सैन्याचे अभिनंदन केले आहे. ऑपरेशन सिंदूरसाठी त्यांचे कौतुक केले आहे.

Uri: काल रात्री पाकिस्तानने उरीमधील नागरिकांना केलं टार्गेट

मनोज सिन्हा हे उरीमधील सैनिकांना भेटण्यासाठी आले आहे. उरीमधील परिस्थितीचा ते आढावा घेत आहेत.

Yogi Adityanath: वर्ल्ड बँक ग्रुपच्या अध्यक्षांनी घेतली योगी आदित्यनाथ यांची भेट

वर्ल्ड बँक ग्रुपचे अध्यक्ष अजय बांगा यांनी योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली आहे.

Amit Shah: अमित शाह यांची बीएसएफच्या महासंचलकांसोबत बैठक

अमित शाह यांनी बीएसएस अधिकाऱ्यांसोबत बैठक बोलवली आहे. दुपारी १२.३० वाजता ही बैठक होणार आहे.

पूंछमधील हल्ल्यात जखमी झालेल्या नागरिकांची उमर अब्दुल्ला यांनी घेतली भेट

जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला जम्मू येथील सरकारी रुग्णालयात दाखल झाले आहेत. पूंछमधील हल्ल्यात जखमी झालेल्या नागरिकांची त्यांनी भेट घेतली आहे.

India Vs Pakistan: भारत पाकिस्तान हल्ल्यावर काँग्रेस नेते संदीप दीक्षित यांची प्रतिक्रिया

भारत पाकिस्तान हल्ल्यावर सर्व क्षेत्रातून प्रतिक्रिया येत आहे. काँग्रेस नेते संदीप दीक्षित यांनीदेखील आपले मत मांडले आहे.

Chandigrah: चंदीगढमध्ये हाय अलर्ट

India Vs Pakistan: संरक्षण मंत्र्यांची तिन्ही सैन्य दलांच्या प्रमुखांसोबत बैठक

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज बैठक बोलवली आहे. त्यांनी तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबच बैठक ठेवली आहे. भारत पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर चर्चा होणार आहे.

Jammu :जम्मू आणि उदामपूरवरुन दिल्लीसाठी ३ स्पेशल ट्रेन सोडणार

भारतीय रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. रेल्वे जम्मू आणि उद्दामपूरवरुन दिल्लीला येण्यासाठी ३ स्पेशल ट्रेन सोडणार आहे.

पाकिस्तानने वर्ल्ड बँकेकडे मागितले कर्ज

पाकिस्तानने वर्ल्ड बँकेकडे आता कर्ज मागितले आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने लोन मागितले आहे. भारताने पाकिस्तानला नाकीनऊ करुन सोडले आहे.

Chandigrah: चंदीगढमध्ये हाय अलर्ट! सायरन वाजवत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

चंदीगढमध्ये सध्या हाय अलर्ट आहे. सायरन वाजवत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

लेहमध्ये आज आणि उद्या शाळांना सुट्ट्या

भारत पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर लेहमध्ये ९ आणि १० तारखेला शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत.

Jammu Kashmir: जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री  ओमार अमिदुल्ला जम्मूकडे रवाना

जम्मू काश्मीरमध्ये सध्या भीतीचे वतावरण आहे. जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री उद्दामपूर मार्गे जम्मूकडे रवाना झाले आहेत.

India Pakistan News:  देशातील अनेक ठिकाणी शाळांना सुट्ट्या

भारत पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

India Vs Pakistan:  पीएसएल मॅच यूएईमध्ये होणार

भारत पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आता पीएसएल मॅच यूएईमध्ये होणार आहेत.

India Vs Pakistan:  बगलिहार धरणाचे दरवाजे उघडले

जIndia Vs Pakistan: जम्मू काश्मीरमधील घरे आणि दुकाने पडली, मोठं नुकसान

जम्मू काश्मीरमध्ये काल रात्री खूप तणावाचे वातावरण होते. काल रात्री ड्रोन हल्ले करण्यात आले. यात जम्मू काश्मीरच्या बॉर्डरवरील नागरिकांची घरे अक्षरशः जळाली, या घरांचे खूप जास्त नुकसान झाले आहे.

Jammu Kashmir: जम्मू काश्मीरमधील दुकानांचे- वाहनांचे नुकसान

Jammu Kashmir: उरी, नौशेरा आणि कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून गोळीबार सुरूच

उरी, नौशेरा आणि कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून गोळीबार सुरूच

जम्मू-काश्मीरमधील नियंत्रण रेषेजवळील भागात पाकिस्तानकडून अजूनही गोळीबार सुरू आहे.

पाकिस्तानला भारतीय सैन्याकडून चोख प्रत्युत्तर दिले जात आहे.

'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेल्या पाकिस्तानकडून राजस्थान आणि जम्मू आणि काश्मीरच्या सीमावर्ती भागात रात्रभर हल्ले सुरू आहेत.

पाकिस्तानचे हल्ल्याचे सर्व प्रयत्न अपयशी, भारताने ५० हून अधिक ड्रोन पाडले

- भारत-पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण आहे.

- मध्यरात्री एलओसीवर दोन्ही बाजूने हवाई हल्ले आणि ड्रोन हल्ले

- भारताने पाकिस्तानचा हल्ल्याचा प्रयत्न हाणून पाडला

- पाकिस्तानचे ५० हून अधिक ड्रोन पाडले

राजौरी, जम्मू आणि काश्मीरमध्ये LoCवर स्फोटांचा आवाज

जम्मू आणि काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ (LoC) स्फोटांचा आवाज ऐकू आल्याची माहिती मिळाली आहे. पाकिस्तानने भारताच्या ऑपरेशन सिंदूर हल्ल्यांच्या प्रत्युत्तरात पुंछ आणि राजौरी भागात तीव्र तोफखाना आणि मोर्टार हल्ले केले. यामुळे अनेक गावांमध्ये नुकसान झाले असून, स्थानिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. स्फोटांचे नेमके कारण आणि नुकसानीची व्याप्ती याबाबत अधिकृत माहिती येणे बाकी आहे.

India Pakistan Attack LIVE : पाकड्याचा गोळीबार सुरूच, LoC वर स्फोटांचा आवाज

जम्मू आणि काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ (LoC) स्फोटांचा आवाज ऐकू आल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हल्ले केल्यानंतर आणि पाकिस्तानने प्रत्युत्तरात गोळीबार व तोफखान्याचा मारा केल्यानंतर घडली. स्थानिकांनी रात्री मोठे स्फोट आणि सायरनचा आवाज ऐकल्याचे सांगितले, ज्यामुळे पुंछमध्ये ब्लॅकआउट लागू करण्यात आला आहे. अधिकृत माहिती अद्याप येणे बाकी आहे.

हा घरात घुसून मारणारा भारत, ऑपरेशन सिंदूरवर एकनाथ शिंदे यांचे परखड वक्तव्य

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑपरेशन सिंदूर संदर्भात पाकिस्तानला कडक इशारा देताना परखड वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, "हा नवा भारत आहे. हा घरात घुसून मारणारा भारत आहे. पाकिस्तानने हद्दीत राहावे. त्याच्या कारवायांचा त्याला भारी फटका बसणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑपरेशन सिंदूरद्वारे त्यांना चांगलाच धडा शिकवला आहे."

India Pakistan Attack LIVE : इराणचे परराष्ट्रमंत्री सय्यद अब्बास अराघची यांची इशाक डार यांच्याशी फोनवर चर्चा

इराणचे परराष्ट्रमंत्री सय्यद अब्बास अराघची यांनी नवी दिल्लीतून पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री इशाक डार यांच्याशी फोनवर संवाद साधला. या चर्चेदरम्यान अराघची यांनी भारत आणि पाकिस्तानमधील वाढता तणाव कमी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (२२ एप्रिल २०२५) भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हल्ले केले, ज्यामुळे तणाव वाढला आहे. अराघची यांनी यापूर्वी दोन्ही देशांना संयम राखण्याचे सांगितले असून, इराण मध्यस्थी करण्यास तयार आहे.

India Pakistan Attack LIVE : जम्मूच्या सांबा येथे घुसखोरीचा प्रयत्न भारताने हाणून पाडला

जम्मू-काश्मीरच्या सांबा जिल्ह्यातील नियंत्रण रेषेवर (LoC) ८ मे २०२५ रोजी रात्री सुमारे ११ वाजता घुसखोरीचा प्रयत्न बीएसएफने हाणून पाडला. बीएसएफ जम्मूने सांगितले की, आंतरराष्ट्रीय सीमेवर मोठ्या घुसखोरीचा प्रयत्न नाकाम करण्यात यश आले. ही घटना भारत-पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर घनली, जिथे ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने दहशतवादी तळांवर हल्ले केले. सांबा येथील घुसखोरीच्या प्रयत्नामुळे सीमेवर सुरक्षा अधिक कडक करण्यात आली आहे, आणि बीएसएफ उच्च सतर्कतेवर आहे.

रावळपिंडी आणि पेशावरमध्येही मोठं नुकसान, रावळपिंडीत पाक सैन्याचं मुख्यालय | Rawalpindi

India Pakistan Attack LIVE : भारत-पाकिस्तानमध्ये सौदी अरेबिया मध्यस्थी करणार

भारताने पाकिस्तानविरुद्ध केलेल्या प्रत्युत्तर कारवाईदरम्यान सौदी अरेबियाचे परराष्ट्रमंत्री इस्लामाबादला भेट देणार आहेत. भारत आणि पाकिस्तानमधील वाढता तणाव कमी करण्याच्या उद्देशाने त्यांचा हा दौरा आहे. सध्या भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हल्ले केल्याने दोन्ही देशांमधील परिस्थिती तणावपूर्ण आहे. सौदी अरेबियाचा हा कूटनीतिक प्रयत्न तणाव निवळण्यासाठी महत्त्वाचा ठरू शकतो.

पाकमध्ये 4 प्रायव्हेट जेट उडताना दिसले | 4 private jets spotted flying in Pakistan

कराची पाठोपाठ भारताचा पेशावरवरही हल्ला | India also attacked Peshawar

India Pakistan Attack LIVE : भारताने पाकड्यांचं इगल AWACS विमान पाडलं

भारतावर हल्ला करण्यासाठी आलेली पाकिस्तानची अत्याधुनिक विमाने हाणून पाडली. एफ 16 आणि जेएफ 17 विमानंही पाडण्यात आली आहेत. एफ 16 आणि जेएफ 17 ही विमाने चीनने पाकिस्तानला दिली होती. मात्र, भारताच्या प्रतिहल्ल्यात चीनकडून मोठा गवगवा करण्यात येत असलेली अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेली ही विमाने पाडण्यात आली आहेत.

India Pakistan Attack LIVE : पाकिस्तानची हल्ला करण्याची हिंमत नाही - एकनाथ शिंदे

पाकिस्तानमध्ये भारतावर हल्ला करण्याची हिंमत नाही. भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला आहे. आता जर पाकिस्तानने भारताविरुद्ध काही केले, तर आपले सशस्त्र सैन्य पाकिस्तानचा नाश करतील, आणि पाकिस्तान नकाशावर दिसणार नाही. हे तर फक्त ट्रेलर आहे. पाकिस्तानने जास्त शहाणपणा दाखवण्याचा प्रयत्न केला, तर त्याला चोख प्रत्युत्तर मिळेल. आपल्या सैनिकांनी कोणत्याही नागरिकांवर हल्ला केलेला नाही. त्यांनी फक्त दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करून त्यांना धडा शिकवला आहे.
एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री

India Pakistan Attack LIVE Updates : दिल्ली विमानतळावरून काही उड्डाणे रद्द

दिल्ली विमानतळाने प्रवास सल्ला जारी केला आहे. विमानतळाच्या कामकाजावर कोणताही परिणाम झालेला नाही, परंतु बदलत्या हवाई क्षेत्रातील परिस्थिती आणि वाढलेल्या सुरक्षा उपायांमुळे काही उड्डाणांवर परिणाम झाला आहे. प्रवाशांना सल्ला देण्यात आला आहे की, त्यांनी आपल्या विमान कंपनीकडून नवीनतम माहिती तपासावी.हवाई सुरक्षा उपायांबद्दल अधिक माहितीइतर भारतीय विमानतळांचे अपडेट

India Pakistan Attack LIVE : पाकिस्तानचे दोन ड्रोन नष्ट, भारताचा करारा जबाब

पाकिस्तानचे दोन ड्रोन पाडण्यात आले. भारतीय लष्कराच्या एअर डिफेन्स युनिट्सने जम्मू-काश्मीरच्या नौसेरा सेक्टरमध्ये ही कारवाई केली. संरक्षण विभागाच्या सूत्रांनी एएनआय वृत्तसंस्थेला ही माहिती दिली.

India Pakistan Attack LIVE - भारतीय लष्काराचा क्वेटावर मोठा हल्ला

भारतीय लष्कराने ७ मे २०२५ रोजी बलुचिस्तानमधील क्वेटा येथे मोठा हल्ला केल्याचा दावा 'DNA India' च्या वृत्तात आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या (२२ एप्रिल २०२५) प्रत्युत्तरात ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय हवाई दलाने क्वेटा आणि इतर १२ पाकिस्तानी शहरांवर ड्रोन आणि मिसाइल हल्ले केले. यात पाकिस्तानी लष्कराचे नुकसान झाले असून, क्वेटामधील लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याचे सांगितले आहे. पाकिस्तानने याला "युद्धाची कृती" संबोधून भारताला इशारा दिला आहे.

India Pakistan Attack LIVE -  आयएनएस विक्रांतचा धमाका, कराची पोर्ट उडवले

India Pakistan Attack LIVE -  आयएनएस विक्रांतचा धमाका, कराची पोर्ट उडवले . कराचीवर हल्ला करत भारताने पाकड्यांच्या नौदलाची ताकद कमी केली.

India Pakistan Attack LIVE : हवाई दलानंतर नेव्हीचा धमाका, पाकिस्तानचे धाबे दणाणले

INS विक्रांतने कराची बंदरगाहावर हल्ला केला आणि त्यामुळे बंदरगाह आणि शहरात मोठी आग लागली. कथितपणे ओरमारा बंदरगाहावरही मिसाइल हल्ले झाले.

नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील नियंत्रण रेषेवर जोरदार गोळीबार सुरू आहे. तर दोन्हीकडून ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल् करण्यात येत आहेत. भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलं आहे. सध्या मर्यादित युद्ध सुरू आङे. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांमध्ये या संघर्षाला तोंड फुटलं आहे.

India Pakistan Attack LIVE : पाकड्यांना भारताचे जोरदार प्रत्युत्तर

पठाणकोटमध्ये भारताच्या हवाई दलाने पाकिस्तानचे लढाऊ विमान हाणून पाडले आहे. भारताने पाकिस्तानच्या हल्ल्याचे प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने पाकिस्तानवर हल्ला केला. भारताकडून पाकिस्तानच्या प्रत्येक हल्ल्याला प्रतुत्तर देण्यात येत आहे. जम्मू काश्मीर, राजस्थानसह आजूबाजूच्या परिसरात संपूर्ण ब्लॅकआऊट करण्यात आले आहे. पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्याला भारताने नाकाम केलेय. भारताने पाकिस्तानची तीन लढाऊ विमाने हाणून पाडली आहेत. पाकिस्तानचे दोन सैनिक पकडण्यात आले आहे. भारताकडून पाकिस्तानला प्रत्युत्तर दाखल उत्तर देण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com