India-France Summit: भारत-फ्रान्समध्ये २० पेक्षा जास्त सामंजस्य करार, वाचा २ देशातील संबंधाच्या ३ खास गोष्टी

India and France Sign Over 20 MoUs: भारत आणि फ्रान्स या दोन देशातील शिखर परिषद मुंबईमध्ये पार पडली. भारत-फ्रान्समध्ये २० पेक्षा जास्त सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
India-France Summit: भारत-फ्रान्समध्ये २० पेक्षा जास्त सामंजस्य करार, वाचा २ देशातील संबंधाच्या ३ खास गोष्टी
India and France Sign Over 20 MoUsSaam Tv
Published On

Summary -

  • मुंबईत भारत-फ्रान्स शिखर परिषद पार पडली

  • दोन्ही देशांमध्ये 20 पेक्षा अधिक सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या

  • संरक्षण, तंत्रज्ञान, आरोग्य आणि कौशल्य विकास क्षेत्रात सहकार्य वाढणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज मुंबई दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान पीएम मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या उपस्थितीत मुंबईत भारत-फ्रान्स शिखर परिषद पार पडली. या शिखर परिषदेमध्ये दोन्ही देशांमधील सहकार्याच्या विविध क्षेत्रांचा समावेश असलेल्या २० पेक्षा अधिक सामंजस्य करारांवर स्वाक्षरा करण्यात आल्या. या करारांमध्ये संरक्षण, कौशल्य, तंत्रज्ञान आणि आरोग्य यासारख्या प्रमख क्षेत्रांचा समावेश आहे. या करारांमुळे दोन्ही देशातील धोरणात्मक भागीदरीला चांगली बळकटी मिळणार आहे.

मुंबईत पार पडलेल्या भारत-फ्रान्स शिखर परिषदेदरम्यान फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन आणि पीएम मोदी यांनी कर्नाटकमध्ये H125 हेलिकॉप्टरच्या अंतिम असेंब्ली लाइनचे व्हर्च्युअल उद्घाटन केले. या कार्यक्रमासाठी भारत आणि फ्रान्सचे संरक्षण मंत्री कर्नाटकात उपस्थित होते. हे एअरबस आणि टाटा अँडव्हान्स्ड सिस्ट्म्स यांचे संयुक्त उपक्रम आहे. मेक इन इंडिया उपक्रमांतर्गत स्थापन झालेली ही असेंब्ली लाइन भारतात संरक्षण आणि एरोस्पेस उत्पादनाला चालना देण्याच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल आहे.

India-France Summit: भारत-फ्रान्समध्ये २० पेक्षा जास्त सामंजस्य करार, वाचा २ देशातील संबंधाच्या ३ खास गोष्टी
France Protest : नेपाळनंतर फ्रान्समध्ये राडा, शेकडो आंदोलक रस्त्यावर उतरले, उद्रेक थांबवण्यासाठी ८०००० पोलिसांचा फौजफाटा तैनात

या परिषदेनंतर पीएम मोदी आणि इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी भारत-फ्रान्स या दोन्ही देशातील संबंधाची ३ प्रमुख वैशिष्ट्ये सांगितली. ते म्हणाले, 'माझ्या चौथ्या अधिकृत भारत भेटीत झालेल्या या स्वागताबद्दल मी तुमचे आभार मानतो. भारत आणि फ्रान्समधील द्विपक्षीय संबंध खरोखरच अपवादात्मक आणि अद्वितीय आहेत. ते विश्वास, मोकळेपणा आणि महत्त्वाकांक्षेवर आधारित आहेत. आज आम्ही ही भागीदारी एका नवीन पातळीवर, विशेष धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर नेण्याचा निर्णय घेतला आहे. यात काहीच शंका नाही कारण आम्हाला या संबंधांवर पूर्ण विश्वास आहे आणि गेल्या ८ वर्षांपासून आम्ही याच भावनेने पुढे जात आहोत.'

India-France Summit: भारत-फ्रान्समध्ये २० पेक्षा जास्त सामंजस्य करार, वाचा २ देशातील संबंधाच्या ३ खास गोष्टी
PM Narendra Modi News : संसदेत मोदींवर हल्ल्याचा प्रयत्न? मोदींना काँग्रेस महिला खासदारांकडून धोका? VIDEO

तसंच त्यांनी पुढे असे देखील सांगितले की, 'दरवर्षी वेगवेगळ्या क्षेत्रात एकत्र काम करून आम्ही अनेक नवीन मार्ग तयार केले आहेत. मग ते इंडो-पॅसिफिक रीजन असो किंवा तंत्रज्ञान असो. ज्याठिकाणी कुणाचेही वर्चस्व असता कामा नये. आम्ही कायद्यावर दृढ विश्वास ठेवतो आणि गेल्या काही वर्षांत प्रत्यक्षात व्यवहारातूनही हे दाखवून दिले आहे. आम्ही संयुक्तपणे सुरू केलेले IMEC असो किंवा आर्टिफिशियल इंटेलिजेंस आणि इंटरनॅशनल सोलर अलायन्स यासारखे मुद्दे असो, गेल्या आठ वर्षांत आम्ही अनेक महत्त्वाचे उपक्रम एकत्रितपणे हाती घेतले आहेत.'

India-France Summit: भारत-फ्रान्समध्ये २० पेक्षा जास्त सामंजस्य करार, वाचा २ देशातील संबंधाच्या ३ खास गोष्टी
PM Modi : पंतप्रधान मोदींच्या विमानाचे हायवेवर एमर्जन्सी लँडिंग, पण कारण काय? पाहा थरारक Video

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com