France Protest : नेपाळनंतर फ्रान्समध्ये राडा, शेकडो आंदोलक रस्त्यावर उतरले, उद्रेक थांबवण्यासाठी ८०००० पोलिसांचा फौजफाटा तैनात

France Protest News : नेपाळ नंतर फ्रान्समध्ये ‘ब्लॉक एव्हरिथिंग’ आंदोलनामुळे हिंसाचार उसळला आहे. पॅरिससह मोठ्या शहरांत आंदोलक आणि पोलिसांत संघर्ष सुरू असून, ८० हजार पोलिस तैनात करण्यात आले आहेत.
France Protest : नेपाळनंतर फ्रान्समध्ये राडा, शेकडो आंदोलक रस्त्यावर उतरले, उद्रेक थांबवण्यासाठी ८०००० पोलिसांचा फौजफाटा तैनात
France Protest NewsSaam tv
Published On
Summary
  • फ्रान्समध्ये ‘ब्लॉक एव्हरिथिंग’ आंदोलनामुळे हिंसाचार उसळला आहे.

  • ८० हजार पोलिस तैनात असून, शेकडो आंदोलकांना अटक करण्यात आली आहे.

  • पॅरिस, बोरदॉ, मार्सिले येथे रस्ते बंद, वाहतूक ठप्प झाली आहे.

  • आंदोलकांनी तेल डेपो, सुपरमार्केट आणि पेट्रोल पंपांनाही लक्ष्य केले आहे.

नेपाळमध्ये हजारो तरूण रस्त्यावर उतरले अन् सत्तापालट झाला. भ्रष्टाचार अन् बेरोजगारीमुळे लोकांचा उद्रेक झाला. नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनाही आपली खुर्ची सोडावी लागली. आता नेपाळसारखीच स्थिती फ्रान्समध्येही उद्भवली आहे. फ्रान्स सध्या देशातील अराजकता अन् संसदेतील अस्थिरतेचा सामना करत आहेत. बुधवारी सकाळी राजधानी पॅरिस अन् इतर मोठ्या शहरात पोलीस अन् आंदोलनकर्ते यांच्यात जोरदार राडा झाला. आंदोलकांना रोखण्यासाठी ८० हजार पोलिसांचा फौजफाटा तैणात करण्यात आलाय. ‘ब्लॉक एव्हरिथिंग’ नावाने सुरू झालेलं आंदोलन अख्ख्या देशात पसरले. फ्रान्समधील परिवहन व्यवस्थाही कोलमडली. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय. पॅरिसमध्ये आतापर्यंत २०० ते ३०० जणांना ताब्यात घेण्यात आलेय. त्यामुळे आंदोलक आणखी चिडले आहेत.

चेहऱ्यावर मास्क लावून शेकडो लोक रस्त्यावर उतरलेत. आंदोलनकर्त्यांनी फ्रान्समधील रस्ते अडवलेत. ठिकठिकाणी कचऱ्याचे डब्बे अन् बॅरिगेट्स लावून वाहतूक अडवली आहे. पॅरिसशिवाय बोरदॉ आणि मार्सिले या शहरातही आंदोलक आक्रमक झालेत. पोलिसांवर बाटल्या अन् फ्लेयर्स फेकल्या जात आहेत. त्याशिवाय रेल्वे हब गारे दू नॉर स्टेनशवरही आंदोलन केले जातेय. सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केल्याप्रकरणी पोलिसांनी अनेकांना बेड्या ठोकल्या आहेत. पुढील काही दिवसांत हा रोष अन् संताप आणखी वाढू शकतो. रस्त्यावर आणखी जमाव उतरू शकतो, असा अंदाज स्थानिक पोलिसांनी वर्तवला आहे. राष्ट्रपती इमॅनुएल मॅक्रो यांनी प्रधानमंत्री सेबास्टियन लेकोर्नू यांची नियुक्ती केल्यानंतर २४ तासांच्या आतमध्येच लोकांचा हा उद्रेक दिसून आलाय. फ्रान्समध्येही मोठ्या प्रमाणात हिंसाचाराच्या घटना घडल्याचे वृत्त आहे.

France Protest : नेपाळनंतर फ्रान्समध्ये राडा, शेकडो आंदोलक रस्त्यावर उतरले, उद्रेक थांबवण्यासाठी ८०००० पोलिसांचा फौजफाटा तैनात
Nepal Protest : नेपाळमध्ये अराजक स्थिती, भारतीयांसाठी मोदी सरकारकडून एडवायजरी, वाचा नेमकं काय सांगितलं

फ्रान्स्वा बायरो यांचं सरकार कोसळल्यानंतर लेकोर्नू यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. बायरो यांना अविश्वास ठराव जिंकण्यात अपयश आल्यामुळे राजीनामा द्यावा लागला. बायरो यांनी देशाचे कर्ज कमी करण्यासाठी £35 अरब (जवळपास 3.7 लाख कोटी रुपये) ची योजना आणली होती. ज्यामधून सरकारी खर्च कमी होईल. त्यामुळे देशावरील कर्ज कमी झालं असतं. पण बायरोचा हा निर्णय फ्रान्समधील लोकांना पटला नाही अन् सरकार कोसळलं. सध्या फ्रान्समधील परिस्थिती बिघडत असून पुढील काही दिवसात उद्रेक वाढण्याची शक्यता आहे. लोकांचा संताप पाहून सरकारने ८० हजार पेक्षा जास्त पोलिसांचा पोलिसांचा फौजफाटा तैनात केलाय.

France Protest : नेपाळनंतर फ्रान्समध्ये राडा, शेकडो आंदोलक रस्त्यावर उतरले, उद्रेक थांबवण्यासाठी ८०००० पोलिसांचा फौजफाटा तैनात
Nepal Protest: नेपाळमधील हिंसक आंदोलनाचा उत्तर प्रदेशला फटका; जाणून घ्या काय आहे कारण?

आंदोलक फक्त रेल्वे आणि रस्ते वाहतूक थांबवत नाहीत, तर तेल डेपो, सुपरमार्केट आणि पेट्रोल पंपांनाही लक्ष्य करत आहेत. सोशल मीडियावर काही गटांनी तर लोकांना दुकान लुटण्याचे आवाहन केलेय. फ्रान्समधील हे आंदोलन ‘यलो वेस्ट्स’ या आंदोलनाची आठवण करून देतेय. यलो वेस्ट्सने काही वर्षांपूर्वी मॅक्रॉन यांना धोरणांमध्ये बदल करण्यास भाग पाडले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com