Nepal Protest: नेपाळमधील हिंसक आंदोलनाचा उत्तर प्रदेशला फटका; जाणून घ्या काय आहे कारण?

Social media ban Nepal 2025 and its effect on India: नेपाळने सोशल मीडियावर बंदी घातल्याने भारत-नेपाळ सीमावर्ती जिल्ह्यांवर परिणाम झाला आहे. सीमापार संबंध बिघडत असल्याने उत्तर प्रदेशातील नागरिकांना जास्त दळणवळण खर्चाचा सामना करावा लागत आहे.
Social media ban Nepal 2025 and its effect on India
Nepal’s social media shutdown hits UP border citizens with rising costs. saam tv
Published On
Summary
  • नेपाळमध्ये सोशल मीडिया बंदीमुळे भारत-नेपाळ सीमावर्ती भाग प्रभावित.

  • उत्तर प्रदेशातील लोकांना कॉलद्वारे संवाद साधावा लागत आहे.

  • कॉल खर्च ८ रुपयांवरून १२ रुपयांपर्यंत वाढला.

भारत आणि नेपाळच्या दरम्यान रोटी-बेटी व्यवहार होत असतो. उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्याच्या सीमा नेपाळ संलग्न आहेत. त्यामुळे येथील नागरिकांचे नातेसंबंध निर्माण झालेत. नेपाळमध्ये सोशल मीडिया बंद केल्याने भारतीय सीमावर्ती भागांवर मोठा परिणाम झालाय. दोन्ही देशातील नागरिक आता फोनवरून साधा कॉल करून संपर्क साधत आहेत. त्यामुळे त्यांच्या खिशावर अधिकचा भार पडतोय. (Social media ban Nepal 2025 and its effect on India)

नेपाळमध्ये सोशल मीडियावर बंदी घालण्यात आलीय. त्याचा मोठा फटका भारताच्या सीमावर्ती भागाला बसलाय. भारत आणि नेपाळमधील लोकांना संपर्क साधण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करता येत नाहीये. ते आता थेट साध्या फोन कॉलद्वारे संपर्क करत आहेत. पण असा फोन कॉल करणं त्यांना महागात पडत आहे. जेथे ते व्हॉटसअ‍ॅपवरून नेटच्या खर्चात संपर्क करू शकत होते. एक फोन कॉल करण्याचा खर्च आधी ८ रुपये होते तेथे आता १२ रुपये खर्च करावे लागत आहे, त्यामुळे त्याच्या खिशावर अधिक भार पडतोय.

Social media ban Nepal 2025 and its effect on India
Nepal Protest : नेपाळ पेटलं! माजी मंत्र्याचे घर पेटवलं, राष्ट्रपतींच्या घरावर कब्जा, पंतप्रधान देश सोडण्याच्या तयारीत

दरम्यान उत्तर प्रदेशातील अर्धा डझन जिल्ह्यांची सीमा नेपाळशी लागून आहे. भारत-नेपाळमध्ये रोटी बेटी व्यवहार होत असतात. त्यामुळे दोन्ही देशात नागरिकांचे अनेक नातेवाईक आहेत.परंतु गेल्या दोन तीन दिवसांपासून नेपाळमध्ये अराजकता वाढत असल्यानं दोन्ही देशातील नागरिकांना आपल्या नातेवाईकांशी संपर्क साधू शकत नाहीत.

Social media ban Nepal 2025 and its effect on India
Nepal Banned Social Media : नेपाळ नंतर 'या' देशात सोशल मीडियावर बंदी, जाणून घ्या

एका वृत्त संस्थेशी बोलताना बहराइच येथील रहिवाशी दिवाकर मिश्रा यांनी सांगितलं की, त्यांची पत्नी नेपालगंज येथील आहे. त्या सध्या माहेरी गेल्या आहेत. त्यामुळे ते आपल्या पत्नीशी व्हॉट्सअॅपवरून संपर्क साधत असायचे. पण आता साध्या फोन कॉलमुळे १२ रुपयांचा त्यांना खर्च येत आहे. त्यामुळे दोघेही कमी वेळ बोलतात. पण त्यामुळे ते चिंतेत राहत आहेत.

हीच परिस्थती नेपाळमधील लोकांची आहे. तेथील व्यापारी अजय टंडन म्हणाले की, व्यावसायामुळे भारतात कोठेही संपर्क साधायचा असतो. परंतु आता फोन करणं इतक महाग झालंय की, फोन कॉल करण्यासाठी अनेकवेळा विचार करावा लागतो. भारतातून नेपाळला फोन करण्यासाठी टॅरिफ मोबाईल ऑपरेटरनुसार, वेगवेगळे आहेत.

परंतु साधरण दर हे ८ ते १२ रुपये प्रतिमिनीट आहेत. तर बीएसएनएलचे दर १० ते १२ प्रतिमिनीट आहेत. जिओ रिलायन्सचे आयएसडी पॅकनुसार, ६.९९ रुपये प्रतिमिनीट साठी खर्च लागतो. तर वोडाफोन-आयडियाच्या नेटवर्कवरील आयएसडी कॉलसाठी १० ते १२ रुपये प्रतिमिनिट खर्च लागतोय. दरम्यान नेपाळमध्ये फेसबूक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्स्अॅप सारखे अनेक सोशल मीडिया आणि मेसेजिंग अॅपला बंदी घालण्यात आलीय. त्यामुळे संतप्त तरुण रस्त्यावर उतरले आहेत. या हिंसक आंदोलनात काठमांडूमधील १७ आणि नेपाळच्या दुसऱ्या भागातील २ जणांसह १९ जणांचा मृत्यू झालाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com