India China Tension : पाकिस्ताननंतर आता चीनच्या कुरापती, चीनविरोधात भारताने केली मोठी कारवाई

Indo China Conflict : अरुणाचल प्रदेशात चीननं कुरापत केली आणि भारतानं चीनची खोड मोडलीय.. भारतानं चीनला मोठा दणका दिलाय....मात्र चीननं कशी कुरापत काढलीय आणि भारतानं चीनची कशी नाकेबंदी केली. पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
Indo China Conflict
Indo China Conflictx
Published On

भारत-पाक संघर्षात पाकिस्तानची बाजू घेऊन चीनने आधीच भारताला डिवचलेलं. त्यातच भर घालत चीननं 'एक्स'वर एक नकाशा प्रसिद्ध करून अरुणाचल प्रदेशातील काही ठिकाणांवर दावा केलाय. तिथल्या ठिकाणांची नावही चीनने परस्पर बदलली आहेत. चीनच्या या आगाऊपणाला भारतानं चोख प्रत्युत्तर दिलयं.

भारताचा ड्रॅगनला इशारा

- अरुणाचल प्रदेशातली नावं बदलण्याचा चीनचा प्रयत्न हास्यास्पद

- अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि राहील

- चीनने केलेल्या नामकरणाने हे सत्य बदलणार नाही

- आम्ही आमच्या तत्वनिष्ठ भूमिकेनुसार असे प्रयत्न धुडकावून लावतो

Indo China Conflict
लेक शाळेत पहिली आली, पण निकाल पाहायला तीच राहिली नाही; घरच्यांना अश्रू अनावर, कारण ठरले 'ते' गावगुंड, काय घडलं?

दरम्यान या खोडसाळपणाला प्रत्युत्तर म्हणून भारतानं चीन सरकारचं मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्सच्या एक्स अकाऊंटवर बंदी घातलीय. याच एक्स अकाऊंटच्या मार्फत चीनी प्रपोगंडा पसरवण्याचं काम सुरु होतं. 1963 च्या चीन-पाकिस्तान करारानंतर चीन हा नेहमीच पाकिस्तानच्या पाठिशी उभा राहिलाय. चीन पाकिस्तानला आर्थिक, तंत्रज्ञानांचीच नव्हे तर लष्करासह, शस्त्रांस्त्रांची मदत देत आला आहे. त्यामुळे चीनचा दुतोंडीपणा भारताला चांगलाच ठाऊक आहे. ज्यामुळे पाकनंतर चीनची नाकेबंदी करण्यासाठी भारतानं कंबर कसलीय.

Indo China Conflict
Crime News: बक्षिशीचा हट्ट, पैशांची मागणी; नर्सच्या अमानवी वर्तनामुळं नवजात बाळाचा मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com