IAS Transfer: 42 IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या; राज्याच्या प्रशासनात मोठा फेरबदल

42 IAS Officers Transferred : जम्मू-काश्मीरमध्ये मोठा प्रशासकीय फेरबदल करण्यात आला आहे. ४२ आयएएस अधिकाऱ्यांसह एकूण ४९ अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्या करण्यात आल्या असून, विकास कुंडल यांची जम्मू विभागीय आयुक्तपदी नियुक्ती झालीय.
42 IAS Officers Transferred
42 IAS officers transferred in major Jammu Kashmir administrative reshufflesaam tv
Published On: 
Summary
  • जम्मू काश्मीरमध्ये ४२ आयएएस अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

  • जम्मू काश्मीर प्रशासनात ४९ अधिकाऱ्यांचा मोठा फेरबदल

  • विकास कुंडल यांची जम्मू विभागीय आयुक्तपदी नियुक्ती

जम्मू-काश्मीरमध्ये प्रशासकीय स्तरावर मोठा फेरबदल करण्यात आलाय. नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी ४२ आयएएस (IAS) अधिकाऱ्यांसह एकूण ४९ अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नियुक्त्यांचे आदेश दिलेत. यामध्ये जम्मूचे विभागीय आयुक्त आणि आठ जिल्ह्यांच्या उपायुक्तांचा समावेश आहे. सामान्य प्रशासन विभागाने (GAD) जारी केलेल्या आदेशानुसार, २०१३ च्या बॅचचे आयएएस अधिकारी विकास कुंडल यांची जम्मूचे विभागीय आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, त्यांनी रमेश कुमार यांची जागा घेतली आहे.

कुंडल जम्मू-काश्मीर सेवा निवड बोर्डाच्या अध्यक्षपदावरून बदली करण्यात आलीय. त्यांना आता जम्मू मेट्रोपॉलिटन रिजन डेव्हलपमेंट अथॉरिटीच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा अतिरिक्त कार्यभारही सोपवण्यात आला आहे.रमेश कुमार यांची ग्रामीण विकास आणि पंचायत राज विभागाचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

ते नवी दिल्ली येथील जम्मू-काश्मीर सरकारचे निवासी आयुक्त म्हणून काम पाहतील. त्यांच्याकडे सांस्कृतिक विभागाचा अतिरिक्त कार्यभारही असणार आहे. जिल्हा स्तरावर, राकेश मिन्हास यांच्या जागी मिंगा शेरपा यांची जम्मूचे उपायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आलीय.

42 IAS Officers Transferred
MPSC पेपरफुटी प्रकरणानंतर मोठा निर्णय; महेंद्र हरपाळकरांची बदली,सरकारनं काढला तडकाफडकी जीआर

देवांश यादव यांची राजौरीचे, अभिषेक शर्मा यांची कुपवाडाचे, जतिन किशोर यांची बडगामचे, श्रेया सिंघल यांची गांदरबलचे, रुपेश कुमार यांची सांबाचे, अनंत द्विवेदी यांची उधमपूरचे आणि कुलदीप कृष्ण सिधा यांची पुलवामाचे उपायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आलीय. चरणदीप सिंग यांची शोपियानचे उपायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आलीय. बडगामचे उपायुक्त अथर आमिर उल शफी खान यांची जम्मू-काश्मीर राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून, तर बशारत कयूम यांची श्रीनगर महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आलीय.

42 IAS Officers Transferred
Pune Police: भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील ४ अधिकारी अन् ११ पोलीस कर्मचाऱ्यांची तडकाफडकी बदली; पोलीस दलात खळबळ

आयुषी सूदन यांना जम्मू-नगर पालिकेचं आयुक्त करण्यात आले आहे. वरिष्ठ स्तरावर, शालीन काब्रा यांच्याकडे महसूल विभागाच्या प्रशासकीय सचिवपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आलाय. आशिष चंद्र वर्मा यांची कृषी उत्पादन विभागाचे वित्त आयुक्त (अतिरिक्त मुख्य सचिव) म्हणून, तर सौगत बिस्वास यांची आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त-सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

राहुल यादव यांची माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रशासकीय सचिव म्हणून आणि ओवैस अहमद यांची नियोजन, विकास आणि देखरेख विभागाचे प्रशासकीय सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आर. ॲलिस वाझ यांची परिवहन विभागाच्या आयुक्त-सचिवपदी नियुक्ती करण्यात आलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com