

अल्पवयीन मुलांना पोलीस व्हॅनवर बसवल्याप्रकरणी कारवाई
पुणे पोलिसांच्या ११ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांवर कारवाई
पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील काही पोलीस अधिकाऱ्यांच्या तडफडकी बदली करण्यात आलीय. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी यासंदर्भातील अधिकृत आदेश जारी केले आहेत. या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडालीय.
अल्पवयीन मुलांना पोलीस व्हॅनच्या बोनेटवर बसवून त्यांची धिंड काढल्याच्या गंभीर प्रकरणी ही कारवाई करण्यात आलीय. या दोन्ही प्रकारांचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर राज्य मानवाधिकार आयोगाने याची दखल घेतली होती. आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती ए. एम. बदर, सदस्या न्यायमूर्ती स्वप्ना जोशी आणि सदस्य संजयकुमार यांच्या पूर्ण पीठाने या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी चौकशी समिती स्थापन केलीय.
दरम्यान गुन्हा दाखल झालेल्या भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तडकाफडकी बदली करण्यात आलीय. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी यासंदर्भातील अधिकृत आदेश जारी केलंय.
या कारवाईत सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांची विशेष शाखेत, तर पोलीस अंमलदारांची पोलीस मुख्यालयात बदली करण्यात आलीय. स्नेहल संभाजी थोरात (सहायक पोलीस निरीक्षक), नीलेश राजेंद्र मोकाशी (पोलीस उपनिरीक्षक), अण्णा मधुकर दराडे (पोलीस उपनिरीक्षक) सद्दाम हुसेन दस्तगीर फकीर (पोलीस उपनिरीक्षक) या अधिकाऱ्यांची विशेष शाथा येथे बदली करण्यात आली.
तर सुनिल दादा हनवते (पोलीस हवालदार), दिनेश विनायक तापके (पोलीस हवालदार), मितेश दत्तात्रय चोरमले (पोलीस अंमलदार), सागर चंद्रकांत बोरगे (पोलीस अंमलदार), सोहम कैलास शेंडकर (पोलीस अंमलदार), मंगेश जयसिंग पवार (पोलीस अंमलदार), राहुल अशोक औंधकर (पोलीस अंमलदार), रवींद्र शंकर गायकवाड (पोलीस अंमलदार), संदिप लक्ष्मण आगळे (पोलीस अंमलदार), तुकाराम पंडित सुतार (पोलीस अंमलदार) सुवर्णा दत्तात्रय भिसे (पोलीस अंमलदार) यांना तात्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश दिले आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.