MPSC पेपरफुटी प्रकरणानंतर मोठा निर्णय; महेंद्र हरपाळकरांची बदली,सरकारनं काढला तडकाफडकी जीआर

MPSC Secretary Mahendra Harpalkar Transferred: MPSC पेपरफुटी प्रकरणानंतर सरकारनं मोठा निर्णय घेतलाय. सचिव महेंद्र हरपाळकर यांची बदली करण्यात आली आहे. यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागाकडून शासन निर्णय जारी करण्यात आल्याचे वृत्त आहे.
MPSC Secretary  Mahendra Harpalkar Transferred
Mpsc Paper Leak: Mahendra Harpalkar Transferred, Judicial Inquiry Into Chairmansaam tv
Published On: 
Summary
  • MPSC सचिव महेंद्र हरपाळकर यांची तत्काळ बदली.

  • पेपरफुटीनंतर विद्यार्थ्यांकडून अध्यक्ष व सचिवांच्या राजीनाम्याची मागणी.

  • MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या कार्यकाळाची न्यायालयीन चौकशी करण्याचा निर्णय.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षांमधील पेपरफुटी, मूल्यमापनातील तफावत आणि परीक्षा प्रक्रियेतील कथित गैरप्रकारांवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर सरकारनं मोठा निर्णय घेतलाय. एमपीएससीचे सचिव महेंद्र हरपाळकर यांची अखेर बदली करण्यात आलीय. यामुळे एमपीएससी परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या मागणीसा मोठं यश आलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बदलीचं आश्वासन विद्यार्थ्यांना दिलं होतं. अखेर महेंद्र हरपाळकर यांची बदली झालीय. सामान्य प्रशासन विभागाकडून या संदर्भातील शासन निर्णय जारी करण्यात आलाय.

MPSC Secretary  Mahendra Harpalkar Transferred
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व प्रमुख मागण्या मान्य; सरकारनं घेतले तीन मोठे निर्णय

मुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस यांची एमपीएससीच्या विध्यार्थीं शिष्टमंडळासोबत चर्चा झाली होती. आजच्या पुण्यातील एमपीससीच्या विद्यार्थीं आंदोलनापूर्वी ही सकारत्मक चर्चा झाली होती. एमपीएससी आंदोलन मागण्यावर मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेत. एमपीएससीचे सचिव महेंद्र होरपाळकर यांची बदली होणार, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना दिले होतं. विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी एमपीएससी आयोगाचे अध्यक्षांचा राजीनामा होती. मात्र अध्यक्षांचा राजीनामा घेता येणार नाही मात्र सचिवांच्या बदलीचे आश्वासन देण्यात आले होते.

काय आहे शासन निर्णय?

महेंद्र उत्तमराव हरपाळकर यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सचिव पदावर दोन वर्षाच्या कालावधीकरिता प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्यात आली होती. मात्र आता प्रशासकीय कारणास्तव महेंद्र उत्तमराव हरपाळकर यांची सचिव पदावरील प्रतिनियुक्ती या आदेशानुसार संपुष्टात आणण्यात येत असून त्यांच्या पदस्थापनेचे आदेश स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येतील. महेंद्र उत्तमराव हरपाळकर, सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांनी त्यांच्या पदाचा कार्यभार अध्यक्ष, महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्या संमतीने अन्य अधिकाऱ्याकडे तात्काळ सोपवावा, असे निर्देश देण्यात आले आहे.

MPSC Secretary  Mahendra Harpalkar Transferred
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा परीक्षेसंदर्भात मोठा निर्णय; मुख्य परीक्षेची तारीख बदलली

30 सप्टेंबर रोजी MPSC विद्यार्थी प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि मागण्या मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी अत्यंत संवेदनशीलतेने ऐकून घेतल्या. व्यवस्थेवरील विद्यार्थ्यांचा विश्वास पुन्हा दृढ करण्यासाठी संविधान आणि कायद्याच्या चौकटीत जेवढे जास्तीत जास्त निर्णय घेणे शक्य आहे, ते घेण्याचा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला होता. अखेर मुख्यमंत्री साहेबांनी आपला शब्द पाळला, अशी प्रतिक्रिया आमदार विक्रम पाचपुते यांनी दिलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com