Shocking : मांजरीच्या मृत्यूने डिप्रेशनमध्ये गेली; २० वर्षाच्या तरुणीने खोलीत जाऊन आयुष्य संपवलं

Hyderabad Tragedy News : हैदराबादमध्ये पाळीव मांजरीच्या मृत्यूनंतर नैराश्यात गेलेल्या २० वर्षीय तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने मानसिक आरोग्याच्या मुद्द्यावर पुन्हा लक्ष वेधले आहे.
Shocking : मांजरीच्या मृत्यूने डिप्रेशनमध्ये गेली; २० वर्ष्याच्या तरुणीने खोलीत जाऊन आयुष्य संपवलं
Hyderabad Tragedy NewsSaam Tv
Published On
Summary
  • हैदराबादमध्ये पाळीव मांजरीच्या मृत्यूनंतर तरुणीची आत्महत्या

  • नैराश्य आणि एकटेपणामुळे टोकाचे पाऊल

  • कुटुंबीयांनी समजावण्याचा प्रयत्न केला पण निष्फळ

  • मानसिक आरोग्याच्या मुद्द्यावर पुन्हा चर्चा

पाळीव प्राण्यांना लळा लावला कि ते आपल्यालाही तितकाच लळा लावतात असं म्हटलं जात. ते आपल्यासोबत नसले तर मनाला चटका लावून जात. अशीच एक धक्कादायक घटना हैद्राबादमध्ये घडली आहे. एका तरुणीच्या मांजरीच्या मृत्यूने ती नैराश्येत गेली. या नैराश्येतून तिने टोकाचं पाऊल उचलल्याचे समोर आले आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका २० वर्षीय तरुणीने काही महिन्यांपूर्वी मांजरीचं पिल्लू दत्तक घेतलं होत. त्या पिल्लावर तिने खूप प्रेम केलं, त्याला मायेने लळा लावला. मात्र काही दिवसांतच त्या मांजराचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर तरुणीला दुःख झाले. ती नैराश्येत गेली. मांजरीशिवाय तिला एकटेपणा जाणवू लागला.

Shocking : मांजरीच्या मृत्यूने डिप्रेशनमध्ये गेली; २० वर्ष्याच्या तरुणीने खोलीत जाऊन आयुष्य संपवलं
Shocking : १३ व्या मजल्यावरून ज्योतिषाची आत्महत्या; पोलिसांनी घराचा दरवाजा उघडताच सापडला आईचा मृतदेह; नेमकं काय प्रकरण? वाचा

तिच्या कुटुंबीयांनी तिला समजावलं. मात्र ती कोणाचंही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. अशातच तिने राहत्या घरी विष प्राशन करून आत्महत्या केली. बराच वेळ तिने प्रतिसाद न दिल्याने कुटुंबीय घाबरले. त्यांनी खोलीत जाऊन पहिले असता त्यांना मुलगी जमिनीवर बेशुद्ध अवस्थेत पडलेली सापडली.

Shocking : मांजरीच्या मृत्यूने डिप्रेशनमध्ये गेली; २० वर्ष्याच्या तरुणीने खोलीत जाऊन आयुष्य संपवलं
Shocking : घृणास्पद! चॉकलेटचं आमिष दाखवून निर्जनस्थळी नेलं, ४ वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या

कुटुंबीयांनी तिला तात्काळ रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पोलिसांनी मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. याप्रकरणी पोलीस अनेक बाजुंनी तपास करत आहेत. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून मृत मुलीच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com