गाझियाबादमध्ये ४ वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली
मृतदेह घरापासून लांब ५०० मीटर अंतरावर फेकण्यात आला
पोलिसांनी आरोपीला अटक केली
प्रकरणाचा तपास सुरू आहे
Ghaziabad 4 Years Old Girl Rape And Murder News उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये एका ४ वर्षांच्या मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे नराधम आरोपी एवढ्यावरच न थांबता त्याने मुलीची हत्या देखील केली आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीचे वडील रोजंदारीवर काम करतात. ते तीन मुलांसोबत राहत होते. १८ मार्च रोजी संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास मुलगी घराबाहेर खेळत असताना, शेजारचा तरुण गौरव प्रजापती याने तिला चॉकलेट देतो सांगून घेऊन गेला. एका निर्जनस्थळी नेवून तिच्यावर बलात्कार केला. मुलगी वेदनांनी आरडाओरडा करत रडत असल्याने तरुणाने निर्दयीपणे तिची दगडाने हत्या केली.
हत्येनंतर पकडले जाऊ नये म्हणून रक्ताने माखलेले हात रुमालाला पुसून तरुणाने घटनास्थळावरुन पळ काढला. संध्याकाळी पीडित मुलीचे वडील घरी आल्यावर त्यांना मुलगी घरी दिसली नाही म्हणून त्यांनी शोधाशोध सुरु केली. तिच्यासोबत खेळणाऱ्या काहींनी तिला शेजारचा तरुण घेऊन गेल्याचे सांगितले.
मात्र तरुण आणि मुलगी घरी न परतल्याने पीडितेच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तातडीने तपास करत मुलीचा शोध लावला. पीडित मुलगी घरापासून सुमारे ५०० मीटर अंतरावर मृत अवस्थेत आढळली. तसेच पोलिसांनी आरोपीचा मागोवा घेत त्याला देखील बेड्या ठोकल्या. दरम्यान या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.