पाकिस्तानातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीने आपल्या भावांच्या मदतीने पत्नीची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केली आहे. दुसऱ्या व्यक्तीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या आरोपांमधून ही हत्या झाल्याचं उघडकीस आलं आहे.
पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील राजनपूर येथील ही घटना आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेच्या पतीला पत्नीचे दुसऱ्या पुरुषाशी अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. यातून त्याचे पत्नीसोबत वाद झाले. या वादातूनच पतीने पत्नीला अमानुष मारहाण केली. (Crime News)
नराधम पतीने क्रूरतेच्या सीमा ओलांडत आधी पत्नीला आपल्या भावांच्या मदतीने आधी झाडाला बांधलं. त्यानंतर दगडाने ठेचून तिची हत्या केली. दगडफेक करण्यापूर्वी त्यांनी महिलेचा अमानुष छळही केला. घटनेनंतर आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. (Latest Marathi News)
पाकिस्तानमधील महिलांचा स्थिती कशी आहे या घटनेवरुन अधोरेखित होत आहे. अनेक महिलांची दरवर्षी येथे हत्या केली जाते. मानवाधिकार कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानमध्ये दरवर्षी सुमारे 1000 महिलांना सन्मानाच्या नावाखाली संपवले जाते. पाकिस्तानातील ही परिस्थिती भीषण आहे. (Political News)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.