Crime News
Crime NewsSaam Tv

Student Killed Teacher : 14 वर्षीय विद्यार्थ्याने शिक्षकाला क्रूरपणे संपवलं, हत्येमागचं कारण ऐकून सगळेच हादरले

Delhi Crime News : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ वर्षीय शिक्षक वारंवार मुलाशी गैरवर्तन करत होता.
Published on

Delhi Crime News :

विद्यार्थ्यांने शिक्षकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना दिल्लीतून समोर आली आहे. शिक्षकाकडून होत असलेल्या लैंगिक अत्याचाराला कंटाळून १४ विद्यार्थ्यांने हे टोकाचं पाऊल उचललं असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. पोलिसांनी याप्रकरणी मुलाला ताब्यात घेतलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ वर्षीय शिक्षक वारंवार मुलाशी गैरवर्तन करत होता. मुलासोबत केलेल्या गैरकृत्याचा शिक्षकाने व्हिडीयो तयार केला होता. या व्हिडीओच्या आधारे ब्लॅकमेल करुन शिक्षक मुलावर वारंवार अत्याचार करत होता. मात्र संयमाचा बांध सुटल्यानंतर विद्यार्थ्यांने बदला घेण्यासाठी धारदार शस्त्राचा वापर करून शिक्षकाची हत्या केली.  (Latest Marathi News)

Crime News
Fake Army Offcer Arrest : लष्करी गणवेश, बॅच... लेफ्टनंट असल्याचं तंतोतंत भासवलं; पण एक चूक अन् थेट तुरुंगात रवानगी

एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, पोलिसांनी दिलेल्या माहितीत 30 ऑगस्ट रोजी दुपारी जामिया नगर येथील बाटला हाऊसमधील घराच्या दुसऱ्या मजल्यावरील एका खोलीबाहेर रक्त बाहेर येत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. (Crime News)

मृत शिक्षकाच्या मानेवर खोलवर जखमा असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आले. शिक्षक आपल्या कुटुंबासह झाकीर नगर येथे राहत होता. प्राथमिक तपासात, शिक्षक समलैंगिक होता आणि दोन महिन्यांपूर्वी त्याने त्या मुलाची भेट घेतली होता. त्यानंतर तो सातत्याने त्याचे लैंगिक शोषण करत होता. व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी तो मुलाला देत होता. (Political News)

Crime News
Nashik Businessman Kidnapping : उद्योगपती हेमंत पारख यांचं नाशिकमधून अपरहण, सूरतजवळ सुटका; मधल्या प्रवासात नेमकं काय झालं?

घटनेच्या दिवशी शिक्षकाने मुलाला जामिया नगरच्या घरी भेटायला बोलवले होते. त्यावेळी मुलगा पूर्ण तयारीनिशी तेथे दाखल झाला. त्याने घरी पोहोचताच पेपर कटरने शिक्षकांच्या मानेवर वार केला. या हल्ल्यात शिक्षकाचा मृत्यू झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com