Heat Wave Alert: उत्तर भारतात उष्णतेचा कहर; एका दिवसात ४० जणांचा उष्माघाताने मृत्यू, राज्यात काय स्थिती?

People Died Due To Heatstroke: उत्तर भारतात उष्मघातामुळे एका दिवसांत ४० लोकांचा मृत्यू झाला आहे. चार राज्यांतील ही आकडेवारी आहे.
 उष्माघाताने मृत्यू
People Died Due To HeatstrokeSaam Tv

प्रमोद जगताप, साम टीव्ही नवी दिल्ली

उत्तर भारतात उष्णतेच्या लाटेचा तडाखा पाहावयास मिळत आहे. उष्माघातामुळे काल (३१ मे) एका दिवसात चार राज्यांमध्ये ४० जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक १७, बिहारमध्ये १४, ओडिशामध्ये ५ आणि झारखंडमध्ये चारजणांचा उष्माघातामुळे मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशमध्ये गेल्या ७२ तासांत १८२ लोकांचा मृत्यू हा उष्णतेच्या लाटेने झाल्याची माहिती मिळत आहे.

अयोध्येत तीन दिवसांत १८ बेवारस मृतदेह अंत्यसंस्कारासाठी आणण्यात आले होते. त्यांच्या मृत्यूचे कारण उष्माघात असल्याचं मानले जात आहे. आज देशात कुठेही उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट (Heat Wave Alert) जारी करण्यात आलेला नाही. पण राजस्थान, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा, दिल्ली, ओडिशा आणि महाराष्ट्रात उष्णतेची लाट असेल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

राज्यात काल (३१ मे) एका संशयिताची उष्मघातामुळे मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. २८ मे रोजी भंडारा जिल्ह्यातील भास्कर तरारे नावाचा इसम शेतात म्हशी चरावयास घेऊ गेला (People Died Due To Heatstroke) होता. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. यासंदर्भात मृत्यूचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच सदर मृत्यू उष्मघाताने झाला की नाही, यासंदर्भात कळवलं जाणार असल्याचं आरोग्य विभागाकडून खुलासा करण्यात आला आहे.

 उष्माघाताने मृत्यू
Bihar Heat Wave: सूर्य आग ओकतोय! बिहारमध्ये उष्णाघातामुळे 10 निवडणूक कर्मचाऱ्यांसह 14 जणांचा मृत्यू

दरम्यान, नागपुरातील सहा मृत्यू उष्मघातामुळे झाला नसल्याचा आरोग्य विभागाकडून खुलासा करण्यात आला ( Maharashtra Temperature Update) आहे. यातील तीन व्यक्तींसंदर्भातील अहवाल मागवण्यात येणार असल्याचं आरोग्य विभागाने स्पष्ट केलं (Weather Update) आहे. मार्च महिन्यापासून उष्माघातामुळे राज्यात २८१ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. नाशिकमध्ये २९, जालन्यात २८, बुलढाण्यात २३, धुळ्यात २० तर सोलापुरात १९ सर्वाधिक उष्मघाताचे रुग्ण आढळले आहेत.

 उष्माघाताने मृत्यू
heat wave : उष्णतेचा प्रकोप! लोकसभा निवडणूक ड्युटीवरील ९ कर्मचाऱ्यांच्या मृत्यू; अनेकांची प्रकृती गंभीर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com