हृदयद्रावक! सासूच्या अंत्यसंस्कारासाठी जावई नदीवर गेला, मगरीने पाण्यात ओढला; एकाच दिवशी कुटुंबावर दुहेरी आघात

Man Dragged By Crocodile During Funeral In Uttar Pradesh: उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यात अंत्यसंस्कारासाठी गेलेल्या तरुणाला घाघरा नदीत मगर ओढून नेल्याची हृदयद्रावक घटना घडली. सासूच्या निधनानंतर काही तासांतच जावयाचा मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुहेरी आघात झाला आहे.
A tragic scene at Ghaghara River where a man was dragged away by a crocodile during funeral rituals in Uttar Pradesh.
A tragic scene at Ghaghara River where a man was dragged away by a crocodile during funeral rituals in Uttar Pradesh.Saam Tv
Published On

उत्तर प्रदेशच्या गोंडा जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. सासूच्या अंत्यसंस्काराला आलेल्या एका तरुणाला मगरीने घाघरा नदीत ओढून नेले. पोलीस स्थानिक गोताखोरांच्या मदतीने त्या तरुणाचा शोध घेत आहेत. ग्रेटर नोएडा येथील रहिवासी दीपक (वय ३०) हा आपली पत्नी आणि मुलीसह सासू उर्मिला देवी (वय ५० वर्षे) यांच्या अंत्यसंस्काराला सासरी आला होता. उर्मिला देवी यांचे मंगळवारी कर्करोगाने निधन झाले होते.

A tragic scene at Ghaghara River where a man was dragged away by a crocodile during funeral rituals in Uttar Pradesh.
Shocking : चिमुकल्या बहिणी खेळता खेळता कारमध्ये गेल्या, दरवाजा बंद केला अन् भयंकर घडलं

चितेसाठी खड्डा खोदल्यानंतर दीपक घाघरा नदीत हात धुण्यासाठी गेला. त्याने पाण्यात हात घालण्यासाठी खाली वाकताच अचानक एक मोठी मगर पाण्याबाहेर आली आणि तिने त्याचे डोके जबड्यात पकडून त्याला झपाट्याने नदीत ओढून नेले. घटनास्थळी उपस्थित असलेले लोक किंचाळत राहिले. काहींनी त्याला वाचवण्याचा प्रयत्नही केला, परंतु मगरीच्या वेगामुळे दीपकला वाचवणे शक्य झाले नाही.

A tragic scene at Ghaghara River where a man was dragged away by a crocodile during funeral rituals in Uttar Pradesh.
कॉकरोच जनता पार्टीचे X अकाऊंट अचानक बंद, नेमकं कारण काय? संस्थापक म्हणतोय, 'ज्याची भीती होती, तेच झालं'

घटनास्थळी एकच खळबळ

हा थरार पाहून नदीकाठी उपस्थित असलेल्या लोकांनी आरडाओरड सुरू केली. काही लोकांनी तात्काळ दीपकला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र मगरीचा वेग जास्त असल्याने तिला रोखण्यात यश आले नाही आणि डोळ्यादेखत दीपक पाठीमागे पाण्याच्या प्रवाहात गायब झाला. सध्या पोलीस प्रशासन आणि स्थानिक गोताखोरांच्या मदतीने नदीत दीपकचा युद्धपातळीवर शोध सुरू आहे. सासूच्या निधनाच्या दुःखातून कुटुंब सावरत नाही तोच जावयासोबत घडलेल्या या भीषण अपघातामुळे संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com