Sakshi Sunil Jadhav
केनेयामध्ये असणारी एल मोलो ही जगातली एक दुर्मिळ जमात मानली जाते. यात फक्त ३०० ते ४०० लोकसंख्या उरली आहे.
मगर आणि पाणघोड्यांची शिकार करणे हे त्यांच्यात शौर्याचे प्रतिक मानतात.
स्थानिक कथांनुसार, एल मोलो शिकाऱ्यांच्या धाडसामुळे जंगलातली हिंस्त्र प्राणीही त्यांच्यापासून दूर राहतात.
आदिवासी लोक हे पुर्वीपासूनच बंदूक किंवा आधुनिक शस्त्रांचा वापर करत नाहीत. ते भाल्याचा वापर करतात.
आदिवाशांची ही जमात मासे, मगर, पाणघोडे आणि इतर वन्य प्राण्यांवर उदरनिर्वाह करते. त्यांचे जीवन पूर्णपणे निसर्गावर अवलंबून आहे.
एल मोलो जमातीतील लोक हे जास्तीत जास्त 30 ते 45 वर्षांपर्यंत जगतात. कमी आयुर्मान आणि बदलती जीवनशैली यामुळे या जमातीचे अस्तित्व धोक्यात आले आहे.
Government of Kenya ने मगर आणि पाणघोड्यांच्या शिकारीवर कडक निर्बंध आणल्यानंतर या जमातीच्या पारंपरिक जीवनशैलीवर मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे अनेक लोक शहरांकडे स्थलांतरित होत आहेत.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.