Sakshi Sunil Jadhav
मे महिन्यात विंचू बिळातून बाहेर येतात. त्यामुळे तुम्ही या दिवसात सावध असणं गरजेचं आहे.
पावसाळ्यात किंवा ग्रामीण भागात विंचू चावण्याची खूप शक्यता असते. विंचूचा दंश लागल्यावर तीव्र वेदना होतात, त्यातलं विष शरीरात पसरतं.
तुम्ही अशावेळेस योग्य उपाय करणं अत्यंत महत्त्वाचं असतं. घरगुती उपाय काही प्रमाणात आराम देऊ शकतात. पण गंभीर लक्षणं दिसत असतील तर लगेचच रुग्णालयात जाणं गरजेचं आहे.
विंचू चावल्यावर सर्वात आधी शांत राहा आणि घाबरू नका , कारण घाबरल्यावर हृदयाची गती वाढते आणि विष लवकर पसरू शकतं.
दंश झालेल्या जागेच्या वर हलक्या हाताने कपडा किंवा दोरी बांधल्यावर विषाचा प्रसार कमी होतो, पण खूप घट्ट बांधू नका.
दंशाच्या जागेवर थंड पाण्याची पट्टी ठेवली तर वेदना आणि सूज कमी होऊ शकते.
विंचूच्या दंशामुळे तीव्र वेदना होत असेल रुग्णालयात लिग्नोकेन इंजेक्शन दिलं जातं, जे काही वेळासाठी त्रास कमी करतं.
काळ्या विंचवाचा दंश जास्त वेदनादायक असतो, त्यामुळे अशा वेळी दुर्लक्ष न करता त्वरित वैद्यकीय मदत घेणं योग्य ठरतं.
उलट्या, घाम येणं, श्वास घेण्यास त्रास किंवा हृदयाचे ठोके वाढणं अशी लक्षणं दिसत असतील तर लगेच रुग्णालयात दाखल व्हा.