Haryana School bus Accident : हरियाणात भीषण अपघात; शाळेची बस उलटल्याने ६ विद्यार्थ्यांचा मृत्यू, बस चालक होता दारुच्या नशेत
Haryana School bus Accident in marathi :
हरियाणाच्या महेंद्रगढ जिल्ह्यातील कनीना गावातून अपघाताची भीषण दुर्घटना समोर आली आहे. गुरुवारी सकाळी खासगी बस उलटून भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेत ६ विद्यार्थ्यांचा मृत्यू झल्याचे समजत आहे. या अपघातात १२ हून अधिक विद्यार्थी जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, हरियाणातील बस अपघातानंतर हरियाणातील महेंद्रगढ जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. बस चालक दारुच्या नशेत असल्याचा आरोप स्थानिक लोकांनी केला आहे. स्थानिक लोकांच्या आरोपानंतर पोलिसांनी या तपासाला सुरुवात केली आहे.
बसमध्ये होते ३५ ते ४० लहान मुले
मीडिया रिपोर्टनुसार, गावातील लोकांनी बस उलटल्याचं पाहिलं. ही बस खासगी शाळेची होती. ही बस जीएल पब्लिक शाळेची बस होती. या बसमध्ये ३५ ते ४० विद्यार्थी प्रवास करत होते. आज सरकारी सुट्टी असतानाही विद्यार्थ्यांना शाळा होती. त्यामुळे शाळेतून बस विद्यार्थ्यांना घेण्यासाठी गेली होती.
एका विद्यार्थ्यांने व्हेंटिलेटवर सोडला श्वास
या भीषण अपघातानंतर स्थानिक लोक तातडीने घटनास्थळी पोहोचले. या स्थानिक लोकांनी रेस्क्यू ऑपरेशन केलं. पाच विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. तर एका विद्यार्थ्याची प्रकृती गंभीर होती. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. हा विद्यार्थी व्हेंटिलेटर होता. मात्र, या मुलाने काही वेळानंतर जीव सोडला. यामुळे या अपघातातील मृत विद्यार्थ्यांची संख्या ६ झाली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

