Shocking: सुंदर मुलांना पाहून यायचा राग, पाण्यात बुडवून करायची हत्या; महिलेने चौघांना संपवलं, पोटच्या मुलालाही सोडलं नाही

Haryana Crime: हरियाणामध्ये एका महिलेने पोटच्या मुलासह ४ मुलांची हत्या केली. आपल्यापेक्षा सुंदर कुणीच नाही असे या महिलेला वाटायचे. त्यामुळे तिने एक एक करत ४ सुंदर मुलांना संपवलं. या सायको किलर महिलेला पोलिसांनी अटक केली.
Shocking: सुंदर मुलांना पाहून यायचा राग, पाण्यात बुडून करायची हत्या; महिलेने चौघांना संपवलं, पोटच्या मुलालाही सोडलं नाही
Haryana Crime News Saam Tv
Published On

Summary -

  • हरियाणातील पानीपत येथे महिलेकडून ४ निष्पाप मुलांची हत्या

  • सुंदर दिसणाऱ्या मुलांना टार्गेट करत करायची हत्या

  • पोटच्या मुलाला देखील या महिलेने संपवलं

  • पाण्यात बुडवून या मुलांना मारून टाकायची

हरियाणातून एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. एका महिलेने ४ निष्पाप मुलांची हत्या केली. ही महिला सुंदर दिसणाऱ्या मुलांची हत्या करून नंतर सेलिब्रेशन करायची. या सायको किलर महिलेला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या महिलेने पोटच्या मुलालाही सोडलं नाही. तिने ज्या पद्धतीने इतर मुलांना मारलं त्याच पद्धतीने आपल्या मुलाची पाण्यात बुडवून हत्या केली. या घटनेमुळे हरियाणात खळबळ उडाली आहे.

पोटच्या मुलालाही संपवलं -

पोलिसांनी हरियाणातील पानिपत येथून आरोपी महिलेला अटक केली. या महिलेने मत्सर आणि मानसिक आजारामुळे चार निष्पाप मुलांची हत्या केली. ही मुलं आरोपी महिलेच्या नातेवाईकांचीच मुलं होती. धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये तिच्या स्वतःच्या मुलाचाही समावेश आहे. आरोपी महिला सुंदर आणि आकर्षक दिसणाऱ्या मुलांना टार्गेट करायची. या मुलांना पाण्याची टाकी किंवा टबमध्ये बुडवून त्यांना मारून टाकायची.

Shocking: सुंदर मुलांना पाहून यायचा राग, पाण्यात बुडून करायची हत्या; महिलेने चौघांना संपवलं, पोटच्या मुलालाही सोडलं नाही
Shocking: भाजप महिला नेत्याच्या घरी सेक्स रॅकेट, ९ तरुणींना आक्षेपार्ह स्थितीत पकडलं

सीसीटीव्ही पाहून पोलिसांना संशय -

घडलं असं की, १ डिसेंबर रोजी नौलठा गावात एका लग्न समारंभात विधी नावाची सहा वर्षांची मुलगी पाण्याच्या टबमध्ये मृतावस्थेत आढळून आली होती. मुलीची उंची टबपेक्षा खूपच मोठी होती. बाथरूमचा दरवाजाही बाहेरून बंद होता. त्यामुळे पोलिसांना विधीच्या मृत्यूवरून संशय आला. पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत तपास सुरू केला. त्यांनी सीसीटीव्ही तपासले त्यामध्ये पूनम नावाची महिला सतत ये-जा करताना दिसली. त्यामुळे पोलिसांना या महिलेवर संशय आला.

Shocking: सुंदर मुलांना पाहून यायचा राग, पाण्यात बुडून करायची हत्या; महिलेने चौघांना संपवलं, पोटच्या मुलालाही सोडलं नाही
Shocking : लिफ्टमध्ये ओढलं अन्... मुंबईत ९ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार, निवृत्त पोलीस अधिकाऱ्याचं हैवानी कृत्य

सुंदर मुलांना पाहून यायचा राग -

विधीच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी पूनमला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आणि तिची कसून चौकशी केली. चौकशीदरम्यान तिने जे काही सांगितले ते ऐकून पोलिसांनाही धक्का बसला. विधीशिवाय तिने यापूर्वी तीन मुलांची हत्या केली. त्यापैकी एक तिचा स्वतःचा मुलगा होता. मुलं सुंदर दिसतात म्हणून तिने त्यांची हत्या केली असल्याचे पोलिसांना सांगितले. ही महिला मनोरुग्ण असून तिला स्वत:च्या सौंदर्यावर हेवा वाटत होता. तिच्यापेक्षा सुंदर कुणीच असू शकत नाही असे तिला वाटत होते. त्यामुळे कुणी सुंदर मुल दिसले की तिला प्रचंड राग यायचा आणि ती त्यांना संपवायची.

Shocking: सुंदर मुलांना पाहून यायचा राग, पाण्यात बुडून करायची हत्या; महिलेने चौघांना संपवलं, पोटच्या मुलालाही सोडलं नाही
Shocking : मालेगाव पुन्हा हादरलं! १४ वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, जबरदस्ती गाडीवर बसवलं अन्...

अशी करायची मुलांची हत्या -

पूनमने सर्वात आधी मेहुण्याच्या सुंदर मुलीला पाण्याच्या टाकीत बुडवून मारले. कुणाला संशय येऊ नये म्हणून तिने स्वत:च्या मुलालाही त्याच टाकीत टाकले. त्यावेळी कुटुंबीयांना हा अपघात असल्याचे वाटले. पोरं खेळता खेळता पाण्याच्या टाकीत पडली आणि त्यांचा मृत्यू झाला असल्याचे त्यांना वाटले. २०२५ मध्ये पूनम माहेरी गेली होती. तिथे तिने निष्पाप भाचीची देखील अशीच हत्या केली. त्याठिकाणीही त्यांना हा अपघात असल्याचे वाटले आणि ते विसरून गेले. प्रत्येक वेळी ती अशाच पद्धतीने मुलांची हत्या करायची. अखेर तिचे सत्य समोर आलेच.

Shocking: सुंदर मुलांना पाहून यायचा राग, पाण्यात बुडून करायची हत्या; महिलेने चौघांना संपवलं, पोटच्या मुलालाही सोडलं नाही
Shocking : धातूचा मोह जीवावर बेतला; निकामी करण्यासाठी ठेवलेल्या बॉम्बचा स्फोट झाला अन्...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com