Shocking : धातूचा मोह जीवावर बेतला; निकामी करण्यासाठी ठेवलेल्या बॉम्बचा स्फोट झाला अन्...

Maharashtra Wardha News : वर्धा जिल्ह्यातील पुलगाव सीएडी कॅम्प परिसरात मुदतबाह्य बॉम्ब निकामी करताना झालेल्या स्फोटात धातू वेचण्यासाठी गेलेल्या युवकाचा मृत्यू. सुरक्षेचं आव्हान देऊनही नागरिकांची बेफिकीर वर्तणूक कायम.
Shocking : धातूचा मोह जीवावर बेतला; निकामी करण्यासाठी ठेवलेल्या बॉम्बचा स्फोट झाला अन्...
Wardha NewsSaam Tv
Published On
Summary
  • पुलगावमध्ये मुदतबाह्य बॉम्बचा स्फोट

  • धातू वेचताना युवकाला जीव गमवावा लागला

  • पूर्वीही अनेक प्राणघातक घटना घडल्या आहेत

  • प्रशासनाचा बंदोबस्त असूनही नागरिकांचा निष्काळजीपणा कायम

चेतन व्यास, वर्धा

वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथील सीएडी कॅम्प परिसरातील मुदतबाह्य बॉम्ब निकामी करताना स्फोट होताच एक युवक जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी सकाळी घडल्याने एकच खळबळ उडाली. या बॉम्बमधून बाहेर पडणारे धातू वेचण्याचा मोह या युवकाच्या जीवावर बेतला आहे. विशेषत: असे अपघात नेहमीच होत असतानाही नागरिकांचा निष्काळजीपणा कायमच आहे.

सीएडी कॅम्पमधील मुदतबाह्य बॉम्ब निकामी केल्यानंतर त्यातून तांबे, पितळ, जप्त व लाेखंड असे विविध धातू बाहेर पडतात. हे धातू वेचण्याकरिता सोनेगाव, चिकणी, देवळी, केळापूर आदी परिसरातील नागरिक जात असतात. गेल्या पंधरा दिवसांपासून येथे हे काम सुरु असल्याने केळापूर येथील संदीप मोतीराम तुमडाम (३५) तेथे गेला होता.

Shocking : धातूचा मोह जीवावर बेतला; निकामी करण्यासाठी ठेवलेल्या बॉम्बचा स्फोट झाला अन्...
Shocking : भयानक! गर्लफ्रेंडची हत्या करणाऱ्या बॉयफ्रेंडचाही मृत्यू, पोलिसांसमोरच आला हार्ट अटॅक

तो पळसाच्या झाडामागे दडून बसला पण, या स्फोटात त्याला जीव गमवावा लागला. सीएडीचे कर्मचारी पूर्ण खबरदारी घेऊन हे काम करीत असतात पण, नागरिक लपून छपून जात असल्याने त्यांना अपघातास सामोरे जावे लागत आहे.धातू वेचायला जाणाऱ्यांपैकी दरवर्षी एक-दोन जीव जातातच. २०१६ मध्ये सुद्धा आग लागली असताना मालमत्तेच्या नुकसानासोबतच जीवित हानी झाली होती. याशिवाय २०२२ मध्ये बॉम्बची पेटी खाली पडल्याने मोठा बॉम्बस्फोट झाला होता.

Shocking : धातूचा मोह जीवावर बेतला; निकामी करण्यासाठी ठेवलेल्या बॉम्बचा स्फोट झाला अन्...
Shirur MlA Mauli Katke : शिरूरमध्ये आजी-माजी आमदार भिडले, मतदान केंद्राबाहेर जोरदार राडा, पाहा व्हिडिओ

यात सोनेगावचे चार, केळापुरचा एक आणि कॅम्पचा एक अधिकारी असे सहा जण मृत्युमुखी पडले होते. त्यानंतर ऑगस्ट २०२४ मध्ये सोनेगाव (आबाजी) येथील योगेश केशव नेरकर यांचा मृत्यू झाला तर एकाला कायमचे अपंगत्व आले.सीएडी कॅम्प अधिकाऱ्यांनी हे अपघात टाळण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत. मुदतबाह्य बॉम्ब निकामी करताना पुर्ण बंदोबस्त करुनच कार्यवाही करतात. पण, धातूच्या हव्यासापोटी लगतच्या परिसरातील नागरिक अधिकाऱ्यांची नजर चुकवून परिसरात शिरतात. यातूनच बरेचदा घात होत असून ही मालिका थांबणार कधी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com