Truck Accident: काळरात्र! नवरात्रीत दर्शनासाठी निघालेल्या भाविकांना चिरडले, १२ जणांचा मृत्यू, २९ जखमी

Sheetla Mata Temple Accident: मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये शीतला माता मंदिराजवळ धान्याने भरलेला ट्रक बॅरिकेड तोडून भाविकांवर धडकला. या भीषण अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला असून ३९ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताच्या कारणांचा प्रशासनाकडून तपास सुरू आहे.
Truck Accident
Truck Accidentsaam tv
Published On: 

मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये शीतला माता देवीच्या मंदिरात दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांवर काळाने घाला घातला. यावेळी धान्याने भरलेला एक ट्रक अचानक नियंत्रणाबाहेर गेला आणि यावेळी या ट्रकने रस्त्यावरून जाणाऱ्या ट्रकला चिरडलंय. या भीषण अपघातात १२ जणांचा मृत्यू झालाय. या घटनेत एकूण ३९ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यापैकी १२ जणांना डॉक्टरांनी मृत घोषित केलं असल्याची माहिती आहे. जखमींमध्ये कर्तव्यावर असलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.

नवरात्री सुरू असल्याने शीतला माता मंदिरात दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक जात होते. त्याच वेळी हा अपघात झाला. त्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. अपघाताची माहिती मिळताच प्रशासनाने घटनास्थळी मदतकार्य सुरू केलं.

Truck Accident
रिसॉर्टला भीषण आग! 10 जणांचा होरपळून मृत्यू, 9 जखमी

बॅरिकेड तोडून ट्रक उतारावरून खाली आला

ग्वाल्हेरचे पोलीस अधीक्षक (एसएसपी) धर्मवीर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, छिनोरच्या दिशेने मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर उतार आहे. या रस्त्यावरून जड वाहनांना जाण्यास बंदी आहे. रविवारी रात्री सुमारे १.३० वाजता धान्याने भरलेला एक ट्रक या ठिकाणी थांबवण्यात आला होता.

मात्र, या ट्रकने रस्त्यावर लावलेले बॅरिकेड तोडले. त्यानंतर ट्रकचालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि ट्रक उतारावरून वेगाने खाली आला. पुढे जाऊन तो मंदिराच्या बाहेरील भिंतीला आणि प्रवेशद्वाराला धडकला. यावेळी रस्त्यावर असलेले अनेक भाविक ट्रकखाली दबले. या दुर्घटनेत १२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

पाच ते सहा जणांची प्रकृती गंभीर

एसएसपी धर्मवीर सिंह यांनी सांगितलं की, अपघातानंतर एकूण ३९ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यापैकी १२ जणांचा मृत्यू झाला आहे. पाच ते सहा जणांना गंभीर दुखापत झाली असून, काहींना फ्रॅक्चर झालं आहे. इतर जखमींना किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

या अपघातात ड्युटीवर असलेले दोन पोलीस कर्मचारीही जखमी झाले आहेत. त्यांच्यावरही रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

Truck Accident
Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

जखमींच्या तपासणीसाठी सीटी स्कॅन आणि एक्स-रे

ग्वाल्हेरच्या जिल्हाधिकारी रुचिका चौहान यांनी सांगितलं की, रात्री सुमारे १.३० वाजता ट्रक नियंत्रणाबाहेर गेल्याची माहिती मिळाली होती. यानंतर तातडीने अॅम्ब्युलन्स आणि इतर वाहनं घटनास्थळी पाठवण्यात आली. या अपघातात १२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती. तर सुमारे २९ जण जखमी झाले होते.

जखमींना नेमकी किती दुखापत झाली आहे, हे समजून घेण्यासाठी त्यांचं सीटी स्कॅन आणि एक्स-रे केलं जातंय. या तपासण्यांमुळे जखमींवर योग्य उपचार करण्यास मदत होणार आहे, असंही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं.

Truck Accident
Eknath Shinde: एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, श्रीकांत शिंदेंनाही मोठं पद मिळावं; देवीच्या चरणी घातलं गाऱ्हाणं

अपघाताबाबतचा तपास सुरू

नवरात्रीच्या काळात मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर बॅरिकेड लावण्यात आले होते. तसंच पोलिसांची तपासणी चौकीही होती. असं असताना धान्याने भरलेला ट्रक बॅरिकेड तोडून मंदिराच्या रस्त्यावर कसा पोहोचला, याचा तपास प्रशासनाकडून केला जातोय. ट्रकमध्ये काही तांत्रिक बिघाड होता का आणि ट्रक डावीकडे वळताना त्यावरील नियंत्रण कसं सुटलं, हे तपासण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या पथकाला घटनास्थळी पाठवण्यात आलं आहे. हे पथक ट्रकची तांत्रिक तपासणी करणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com