Eknath Shinde: एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, श्रीकांत शिंदेंनाही मोठं पद मिळावं; देवीच्या चरणी घातलं गाऱ्हाणं

Maharashtra Drought Crisis: डोंबिवलीतील नवरात्रोत्सवात एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील दुष्काळ दूर होण्याचा विश्वास व्यक्त केला. दुष्काळामुळे यंदा गरबा रद्द करून सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले. शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी मदत दिली असून, दसरा-दिवाळीत शिधा पोहोचवण्याचे आश्वासन दिले.
Maharashtra Drought Crisis
Maharashtra Drought Crisissaam tv
Published On: 

राज्यातील दुष्काळाचे संकट दूर व्हावं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनाही मोठं पद मिळावं, यासाठी देवीच्या चरणी कोकणी भाषेत गाऱ्हाणं घालण्यात आलं. यावर बोलताना, “कोकणात गाऱ्हाणे घालण्याची परंपरा आहे. गाऱ्हाणं घातलं की ते खरं होतं. राज्यातील दुष्काळ नक्कीच दूर होईल,” असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि श्री नवदुर्गा युवा मंडळाच्या वतीने डोंबिवली पूर्वेतील डी.एन.सी. शाळेच्या मैदानावर शारदीय नवरात्रोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. या उत्सवाला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी भेट दिलीये. राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन यंदा गरबा रद्द करण्यात आला असून, त्याऐवजी सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय.

Maharashtra Drought Crisis
Maharashtra Politics: मोठी बातमी! दसऱ्यानंतर शिवसेनेत होणार मोठे फेरबदल, एकनाथ शिंदे अकार्यक्षम मंत्र्यांना डच्चू देणार

उत्सवाच्या मंडपात गावाची प्रतिकृती उभारण्यात आली आहे. प्रत्येकाला आपल्या गावाची ओढ असते. कोकणात गणपती आणि शिमगा हे सण लोकप्रिय आहेत. महाराष्ट्र हा शेतकरी, कष्टकरी, वारकरी आणि संतांचा आहे. सण-उत्सवांची परंपरा जपण्याचं काम या माध्यमातून केलं जातंय, असं शिंदे यांनी सांगितलं. यावेळी त्यांच्या हस्ते सभामंडपात देवीची आरती करण्यात आली.

Maharashtra Drought Crisis
शिंदेसेना मंत्रिपदाची भाकरी फिरवणार? दसऱ्यानंतर शिंदेसेनेत फेरबदलाचे संकेत

दरम्यान, केडीएमसीचे स्थायी समिती सभापती मल्लेश शेट्टी तसंच शिंदे सेनेचे नगरसेवक निलेश शिंदे, महेश गायकवाड आणि कुणाल पाटील यांनी वाढदिवस साजरा न करता दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला. या सर्वांनी मदतीचे धनादेश उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे सुपूर्द केले. त्याचप्रमाणे दसरा आणि दिवाळीच्या काळात शेतकऱ्यांना शिधा दिला जाणार असून तो वेळेत पोहोचवला जाईल, असेही शिंदे यांनी सांगितलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com