घराला आग लागून घडली भीषण दुर्घटना; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू

surat shocking : सूरतमध्ये घराला आग लागून भीषण दुर्घटना घडली आहे. या घटनेत एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.
gujarat surat shocking
surat shocking Saam tv
Published On
Summary

सूरतच्या लिंबायत भागात घडली भीषण दुर्घटना

एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून झाला मृत्यू

घरात सुरू असलेल्या साड्यांच्या पॅकिंगमुळे आग वेगाने पसरली

Surat fire incident : गुजरातच्या सूरत जिल्ह्यात लिंबायत भागात मंगळवारी मोठी दुर्घटना घडली आहे. एका घराला आग लागल्याने एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आग लागल्याची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी घटनास्थळी पोहोचून घरातील ५ जणांचे मृतदेह ताब्यात घेतले. पोलिसांनी ५ जणांचे मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवले.

घटनास्थळी पोहोचलेले पोलीस अधिकारी बलराम मीणा यांनी सांगितलं की, 'लिंबायत पोलीस स्टेशनच्या हद्दीत आज मंगळवारी सकाळी एका घराला आग (Fire) लागल्याची माहिती मिळाली. साड्यांना पॅकिंग करण्याचे काम करणाऱ्या कुटुंबाच्या घराला आग लागली.

gujarat surat shocking
पुण्यात भीषण अपघात! भरधाव कार-दुचाकीची समोरासमोर धडक; 21 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

या घरात मोठ्या प्रमाणात साड्या होत्या. सुरुवातीला साड्या जळू लागल्या. त्यानंतर या दुर्घटनेत ५ जण होरपळले. या घटनेता या ५ जणांचा मृत्यू झाला. आग लागण्याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनास्थळी एफएसएलची टीम घटनास्थळी उपस्थित आहे'.

दोन मजली घरात तळ मजल्याच्या खोलीत मंगळवारी सकाळी ११ वाजता गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने घराला आग लागल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. बघता बघता या आगीने रौद्ररुप धारण केलं. या भीषण आगीत कुटुंबातील कोणत्याही सदस्याला घरातून बाहेर पडण्यास वेळ मिळाला नाही. या दुर्घटनेत ५ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये ४ महिला आणि एका लहान मुलाचा समावेश आहे.

gujarat surat shocking
Maharashtra Live News Update: अहिल्यानगरमध्ये वीज कोसळून शेतकऱ्याचा मृत्यू, पाळीव कुत्राही दगावला

शहनाज बेगम अन्सारी(६५), हुसैना बेगम अन्सारी(18), शबीना रमजान अन्सारी (२८), खुशनुमा अब्दुल अन्सारी (19) आणि सुभान रमजान अन्सारी (४) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेने अन्सारी कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तर ५ जणांच्या मृत्यूने परिसरात शोककळा पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com