गुजरातमधील राजकोट जिल्ह्यातील उपलेटा परिसरात अवघ्या चार तासांत एकापाठोपाठ 9 भूकंपाचे धक्के जाणवले.
या भूकंपांची तीव्रता रिष्टर स्केलवर 2.7 ते 3.8 दरम्यान नोंदवण्यात आली असून सकाळी 6.19 वाजता पहिला धक्का बसला.
उपलेटा सोबतच धोराजी आणि जेतपूर भागातही कंपन जाणवले, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
खबरदारी म्हणून जेतपूरमधील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली असून प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
महाराष्ट्राच्या शेजारच्या राज्यात म्हणजेच गुजरातमध्ये 4 तासांत भूकंपाचे मोठे धक्के बसले आहे. गुजरातमध्ये पुन्हा एकदा निसर्गाने कोप दाखवायला सुरुवात केली आहे. राजकोट जिल्ह्यातील उपलेटा परिसरात शुक्रवारी सकाळी एकापाठोपाठ 9 भूकंपाचे धक्के जाणवल्याने एकच घबराहट जाणवली. अवघ्या चार तासांत 9 वेळा जमीन हादरल्याने लोकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. एखाद्या मोठा भूकंप तर नाही येणार ना? या भीतीने लोक घराबाहेर येत पळून जाऊ लागले.
आज सकाळच्या सुमारास 6.19 मिनिटांनी भूकंपचा पहिला झटका बसला, याची तीव्रता रिष्टर स्केलवर 3.8 इतकी नोंदवण्यात आली. त्यानंतर लगेचच एका तासात सहा आणि पुढील चार तासांत एकूण नऊ धक्के बसले. या भूकंपाची तीव्रता 2.7 ते 3.8 च्या दरम्यान होती. फक्त उपलेटाच नाही तर धोराजी आणि जेतपूरमध्येही जमीनिखालून येणाऱ्या आवाजामुळे आणि कंपनांमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून जेतपूरमधील शाळांना लगेचच सुट्टी जाहीर करण्यात आली.
भूकंप विज्ञान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, या सर्व भूकंपाचे केंद्रबिंदू उपलेटा शहरापासून साधारण 27 किमी अंतरावर होते. काल गुरुयारी रात्री 8.43 मिनिटांनी 3.3 तीव्रतेचा धक्का बसला होता. त्यानंतर शुक्रवारी एकामागून एक धक्के सुरूच राहिले. स्थानिक प्रशासन आणि महानगरपालिका पथकाने लगेचच उपलेटा परिसरात पोहोचले आणि नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.