Accident : भयंकर अपघात! दोन कारची समोरासमोर धडक, होरपळून ८ जणांचा जागीच मृत्यू

गुजरातच्या सुरेंद्रनगर जिल्ह्यात दोन कारची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. कार जळून खाक झाली असून, ८ जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये ५ महिला व २ लहान मुलांचा समावेश आहे. ३ जण जखमी आहेत.
ighway accident Gujarat,
ighway accident Gujarat,S
Published On
Summary
  • सुरेंद्रनगरमध्ये दोन कारची समोरासमोर धडक होऊन अपघात.

  • अपघातानंतर कार जळून खाक, ८ जणांचा जागीच मृत्यू.

  • मृतांमध्ये महिला व लहान मुलींचा समावेश.

  • ३ जण जखमी, रुग्णालयात उपचार सुरू.

  • पोलिसांकडून मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू.

Gujarat Accident News : गुजरातमध्ये भयंकर अपघात झालाय. दोन कारची समोरासमोर जोरदार धडक झाली. त्यानंतर कारला लागलेल्या आगीत होरपळून आठ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतामध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे. या अपघातात तीन जण जखमी आहेत, त्यांच्यावर जवळच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत. गुजरातमधील सुरेंद्रनगर जिल्ह्यात हा भयंकर अपघात झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी घाव घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत.

सुरेंद्रनगर जिल्ह्यात झालेल्या भीषण कार अपघातात आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर घटनास्थळावर एकच खळबळ उडाला होता. भीषण अपघाताची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले आणि स्थानिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल केले. या अपघातात तीन जणांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांची ओळख पटवली जात आहे. सर्व मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहेत.

ighway accident Gujarat,
Mumbai Rains : मुंबईत पावसाचा धुमाकूळ, अंधेरी सबवे पाण्याखाली, वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे जॅम|VIDEO

8 जणांचा मृत्यू

स्विफ्ट डिझायर आणि टाटा हॅरियर या कारची रविवारी जोरात धडक झाली. पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, स्थानिकांनी पोलिस आणि 108 पथकाला माहिती दिल्यानंतर बचावकार्य सुरू झाले. हा अपघात दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास वढवण परिसरातील डेडादरा गावाजवळील महामार्गावर झाला. कार कडू गावाहून सुरेंद्रनगर शहराकडे जात होती. एसयूव्हीमधील तीन जण अपघातातून वाचले असून त्यांना किरकोळ जखम झाली आहे., त्यांच्यावर स्थानिक रूग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर कार रस्त्याच्या कडेला खड्ड्यात पडली आणि त्याला आग लागली, ज्यामुळे त्यातील सर्व प्रवासी अडकले आणि जळून मृत्यू झाला. या अपघातामध्ये ८ जणांचा मृत्यू झाला.

ighway accident Gujarat,
भाविकांचा टॅक्टर महादेव डोंगराच्या दरीत कोसळला, २ महिलांचा जागीच मृत्यू, २४ जखमी

डीआयजींनी दिली माहिती

सुरेंद्रनगरचे डीआयजी गिरीश पंड्या यांनी सांगितले की, कारमधील सर्व आठ जणांचा जळून मृत्यू झाला. एसयूव्हीमधील तीन जण किरकोळ जखमी झाले आहेत, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांमध्ये पाच महिला आणि दोन मुलांचा समावेश आहे, यात 10 महिन्यांची आणि 13 वर्षांच्या दोन मुलींचा समावेश आहे. याशिवाय 35 ते 55 वयोगटातील पाच महिला आणि ड्रायव्हरचा अपघातात मृत्यू झाला.

ighway accident Gujarat,
Ahilyanagar Fire : अहिल्यानगरमध्ये मध्यरात्री भीषण आग, एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com