Gold Silver Price Today : आठवड्याच्या सुरूवातीलाच सोने-चांदी दरात घसरण; जाणून घ्या आजचा भाव

आठवड्याच्या सुरूवातीलाच सोने-चांदी दरात घसरण झाली आहे.
Gold-Silver Price Today, Gold Silver rate
Gold-Silver Price Today, Gold Silver rate Saam Tv
Published On: 

Gold Silver Price Today : लग्नसराईच्या हंगामात अनेकांनी सोने खरेदी करण्याकडे कल केला आहे. त्यामुळे सोन्या-चांदीच्या दरात कधी घसरण, तर कधी वाढ होताना दिसून येत आहे. अशातच तुम्ही जर स्वस्तात सोने खरेदी करायचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण, आठवड्याच्या सुरूवातीलाच सोने-चांदी दरात घसरण झाली आहे. (Latest Marathi News)

Gold-Silver Price Today, Gold Silver rate
Kolhapur Crime : शिक्षक की हैवान? नववी-दहावीच्या विद्यार्थीनींना दाखवत होता 'तसले' व्हिडीओ

आजचा सोन्याचा भाव काय?

सोमवारी सराफा बाजार खुलताच, सोन्याच्या (Gold) दरात तेजी दिसून आली होती. काही वेळासाठी सोन्याचे भाव वधारले होते. मात्र, दुपारनंतर त्यात प्रतितोळा ८० रुपयांनी घसरण झाली. त्यामुळे २४ कॅरेट शुद्धतेच्या सोन्याच्या भाव प्रतितोळा ५६ हजार ८८० रुपये इतका झाला.

आजचा चांदीचा भाव काय?

सराफा बाजार उघडताच, सोन्याबरोबर  चांदीच्या (Silver) दरातही मोठी वाढ झाली होती. मात्र, काही वेळानंतर चांदीचे दर झपाट्याने खाली आले. त्यानंतर दुपारनंतर चांदीच्या दरात प्रतिकिलो १८० रुपयांची घसरण झाली. त्यामुळे चांदीचा भाव प्रतितोळ ६८ हजार ७९५ इतका झाला आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजने ही माहिती दिली आहे.

Gold-Silver Price Today, Gold Silver rate
Navneet Rana : खासदार नवनीत राणांना कोर्टाचा दणका; थेट वडिलांना केलं फरार घोषित

मिस्ड कॉल देऊन सोन्याचे दर मिळवा

सोन्या-चांदीच्या (Gold And Silver) किंमती तुम्ही घरबसल्या सहजपणे जाणून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला फक्त 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल. तुमच्या फोनवर मेसेज येईल. त्यात तुम्ही सोन्या चांदीचे अधिकतम दर मिळवू शकता.

शुद्ध सोने कसे ओळखावे?

सोन्याची शुद्धता तपासायची असेल, तर त्यासाठी सरकारने एक अ‍ॅप बनवले आहे. बीआयएस केअर (BIS Care) अ‍ॅपद्वारे ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. या अ‍ॅपपद्वारे तुम्ही केवळ सोन्याची शुद्धता तपासू शकत नाही, तर त्याच्याशी संबंधित कोणतीही तक्रारही करू शकता. हे अ‍ॅप आपल्याला प्रत्येक प्रकारे मदत करते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com