Navneet Rana : खासदार नवनीत राणांना कोर्टाचा दणका; थेट वडिलांना केलं फरार घोषित

Navneet Rana Cast Certificate Issue : अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांना कोर्टाने मोठा दणका दिला आहे.
MP Navneet Rana
MP Navneet RanaSaam TV
Published On

Navneet Rana News : अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांना कोर्टाने मोठा दणका दिला आहे. अवैध जात प्रमाणपत्राच्या आरोपांप्रकरणी मुंबईतील कोर्टाने नवनीत राणा यांचे वडील हरभजनसिंह रामसिंह कुंडलेस यांना फरार घोषित केले आहे. इतकंच नाही तर, कोर्टाने नवनीत राणा आणि त्यांच्या वडिलांना कोर्टाने १ हजार रुपयांचा दंड देखील ठोठावला आहे. (Latest Marathi News)

MP Navneet Rana
Baba Ramdev News: आम्ही जर हत्यारं उपसली असती तर.., बाबा रामदेव यांचं वादग्रस्त विधान

अवैध जात प्रमाणपत्राच्या आरोपांप्रकरणी अमरावतीच्या अपक्ष नवनीत राणा यांच्याविरोधात मुंबईतील शिवडी येथील कोर्टात खटला सुरू आहे. आज या प्रकरणाची सुनावणी होती. आज सुनावणी वेळी नवनीत राणा यांचे वकील कोर्टात उपस्थित नव्हते. (Breaking Marathi News)

त्यामुळे राणा यांच्या एका ज्युनिअर वकिलाने कोर्टात सुनावणी तहकूब करण्याची मागणी केली. प्रकरण सुप्रीम कोर्टात आहे, त्यामुळे स्थानिक कोर्टाने पुढील कार्यवाही करू शकत नाही, असा अर्ज नवनीत राणा (Navneet Rana) यांच्याकडून करण्यात आला आहे.

त्यावर फिर्यादी पक्षाने विरोध केला. सुप्रीम कोर्टातील प्रकरण हे दीवाणी न्यायालयाशी जुळणारा आहे तर मॅजिस्ट्रेट कोर्टाकडून सुनावण्यात येणारे प्रकरण हे एक गुन्हेगारी स्वरुपाचे आहे, असे फिर्यादी पक्षाने म्हटले. या प्रकरणी मुलुंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. असंही फिर्यादी पक्षाकडून सांगण्यात आलं.

MP Navneet Rana
Crime News : पतीला जडलं होतं दारुचं व्यसन; पत्नी भोंदुबाबाकडे गेली अन्.., हादरवून टाकणारी घटना

दरम्यान, शिवडीच्या मॅजिस्ट्रेट कोर्टात सुनावणी सुरू होताच नवनीत राणा यांच्या वडिलांच्या नावाचा पुकारा करण्यात आला. पुकारा होऊन सुद्धा नवनीत राणा यांचे वडील हरभजनसिंह रामसिंह कुंडलेस हे कोर्टात हजर न झाल्याने त्यांना फरार घोषित करण्यात आले.

यापूर्वी हरभजनसिंह यांच्याविरोधात कोर्टाने अजामीनपात्र वॉरंट बजावले होते. मात्र, त्यांनी कोर्टात हजेरी लावली नाही. त्यामुळे आता कोर्टाने त्यांना फरार घोषित केले असून आता हरभजनसिंह यांच्या निवासस्थानी कोर्टाची नोटीस लावण्यात येईल.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com