Crime News : पतीला जडलं होतं दारुचं व्यसन; पत्नी भोंदुबाबाकडे गेली अन्.., हादरवून टाकणारी घटना

एका पत्नीने भोंदुबाबाच्या मदतीने आपल्याच पत्नीची हत्या केली.
Uttar Pradesh Crime News
Uttar Pradesh Crime NewsSaam TV

Uttar Pradesh Crime News : संसाराचा गाडा हाकताना पती-पत्नीमध्ये नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणावरून वाद होत असतात. अनेकदा हे वाद लगेच मिटतात, तर काही वेळा वाद इतके विकोपाला जातात की, त्यावरून मोठे गुन्हे घडतात. अशीच एक घटना उत्तरप्रदेशातून समोर आली आहे. इथे एका पत्नीने भोंदुबाबाच्या मदतीने आपल्याच पत्नीची हत्या केली. (Breaking Marathi News)

Uttar Pradesh Crime News
Viral Video : प्रेमीयुगुलाची गच्चीवर सुरू होती रासलीला; अचानक आई आली अन्...

याप्रकरणी पोलिसांनी आरोपी भोंदुबाबा आणि मृत व्यक्तीच्या पत्नीसह इतर ६ जणांचा अटक केली आहे. सुरजीत (वय ३३ वर्ष) असं मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींचं नाव आहे. 22 जानेवारीला सुरजीतचा मृतदेह पोलिसांना एक रेल्वे ट्रॅकवर आढळून आला होता.

सुरजीत याची हत्या झाली असावी, असा संशय पोलिसांना होता. पोलिसांनी सुरजीतची पत्नी विमला हिला ताब्यात घेऊन तिची चौकशी केली असता, तिने धक्कादायक खुलासे केले आहेत. आपणच भोंदुबाबाला पतीच्या हत्येची सुपारी दिली असल्याचं तिने कबुल केलं.  (Latest Marathi News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जलालाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गौस नगर येथील रहिवासी असलेल्या सुरजीतला दारूचे व्यसन होते. कमावलेले सगळे पैसे तो दारूत वाया घालायचा. दरम्यान, त्याची पत्नी विमला आणि मेहुणीने बरेली येथे राहणाऱ्या तांत्रिक इरफानची भेट घेतली.

Uttar Pradesh Crime News
Crime News : पत्नीला दहावीच्या विद्यार्थ्यासोबत नको त्या अवस्थेत बघितलं; पतीचं कृत्य पाहून पोलिसही चक्रावले

सुरुवातीला त्यांनी तंत्रमंत्राद्वारे दारूच्या नशेतून मुक्ती मिळवण्याबाबत सांगितले. पण सुरजीतची दारू सुटली नाही. यानंतर पत्नी विमला हिने पतीला मार्गावरून हटवण्यासाठी तांत्रिकाशी बोलणे केले. पतीच्या हत्येसाठी पत्नीने आणि मेहुणीने तांत्रिकाला 2 लाख दिले.

यानंतर तांत्रिकाच्या चार साथीदारांनी सुरजीतला दारू पाजण्याच्या बहाण्याने अज्ञास्थळी नेले. तेथे सुरजीतची दगडाने ठेचून हत्या केली. हत्येनंतर मृतदेह रेल्वे ट्रॅकवर फेकून दिला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी भोंदुबाबा सुरजीतची पत्नी विमला आणि मेहुणीसह इतर ६ जणांना अटक केली आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com