Kolhapur Crime : शिक्षक की हैवान? नववी-दहावीच्या विद्यार्थीनींना दाखवत होता 'तसले' व्हिडीओ

एका शिक्षकानेच नववी आणि दहावीच्या विद्यार्थीनींना अश्लिल व्हिडीओ दाखवल्याचा प्रकार समोर आला आहे.
Kolhapur Crime News
Kolhapur Crime News Saam TV
Published On: 

रणजित मांजगावकर, साम टीव्ही

Kolhapur Crime News : कोल्हापूर जिल्ह्यातून एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. येथे एका शिक्षकानेच नववी आणि दहावीच्या विद्यार्थीनींना अश्लिल व्हिडीओ दाखवल्याचा प्रकार समोर आला आहे. जिल्ह्यातील शेळेवाडी येथील नामांकित शाळेत हा प्रकार घडला आहे. (Latest Marathi News)

Kolhapur Crime News
Crime News : पतीला जडलं होतं दारुचं व्यसन; पत्नी भोंदुबाबाकडे गेली अन्.., हादरवून टाकणारी घटना

या संपूर्ण प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. प्रकरण समोर येताच, विद्यार्थ्यांसह पालकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. या नराधम शिक्षकाविरोधात (Teacher) कठोरात कठोर कारवाई करा, अशी मागणी केली जात आहे.

प्राप्त माहितीनुसार, विद्यार्थीनींना अश्लिल व्हिडीओ दाखवलेला शिक्षक हा इंग्रजी विषय शिकवतो. गेल्या दोन वर्षांपासून हा शिक्षक नववी आणि दहावीच्या विद्यार्थीनींना पॉर्न व्हिडीओ दाखवून त्यांच्यासोबत अश्लिल चाळे करत होता. (Breaking Marathi News)

Kolhapur Crime News
Viral Video : प्रेमीयुगुलाची गच्चीवर सुरू होती रासलीला; अचानक आई आली अन्...

याप्रकरणाला काही विद्यार्थीनींनी वाचा फोडली. त्यामुळे या नराधम शिक्षकाचं गैरकृत्य समोर आलं. याप्रकरणी गावातील विद्यार्थी आणि पालक संतप्त झाले आहेत. या शिक्षकावर तातडीने गुन्हा दाखल करा, अशी मागणी केली जात आहे. मात्र, शाळेकडून अद्यापही कुठलीही कारवाई झाली नसून, संबंधित शिक्षकाची तातडीने सातारा जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com