Funny Dance Video: आवरा हिला! तरुणीचा रेल्वे स्टेशनवर विचित्र डान्स, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले; 'हॉस्पीटलमध्ये घेऊन जा...'

Viral Dance Video: व्हिडीओमधील (Viral Video) तरुणी भर प्रवाश्यांच्या गर्दीत एवढा अतरंगी डान्स करताना दिसत आहे..
Viral Video
Viral VideoSaamtv

Viral Dance Video: सोशल मीडियावर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे डान्स व्हिडिओ व्हायरल होतात. हे जबरदस्त डान्स व्हिडिओ पाहून हसून हसून पुरेवाट लागते. सध्या सोशल मीडियावर अशाच एका डान्सची तुफान चर्चा होत आहे. ज्यामध्ये एक तरुणी रेल्वे स्टेशनवर डान्स करताना दिसत आहे. तिच्या या डान्सने स्टेशनवरील प्रवासीही चांगलेच वैतागल्याचे पाहायला मिळत आहे. काय आहे या व्हायरल व्हिडिओमागील कथा, चला जाणून घेवू... (Latest Marathi News)

Viral Video
Viral Funny Dance Video: जबरदस्तचं! असा खतरनाक 'कोंबडा डान्स' कधीच पाहिला नसेल; व्हिडिओने लावले नेटकऱ्यांना वेड

सोशल मीडियावर (Social Media) सध्या रेल्वे स्थानकावरील डान्सचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. ज्यावर नेटकऱ्यांच्या जोरदार प्रतिक्रिया पाहायला मिळतात. सध्या अशाच एका व्हिडिओने लक्ष वेधले आहे. ज्यामधील मुलीचा डान्स पाहून तिला वेड्याच्या इस्पितळात नेण्याच्याच सुचना नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. या तरुणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यावर संताप व्यक्त होत आहे.

व्हिडीओमधील (Viral Video) तरुणी भर प्रवाश्यांच्या गर्दीत एवढा अतरंगी डान्स करतेय, डान्स करताना तिचे हात, पाय कुठे, काय जातायत याचे भान तिला राहिले नाही. अगदी विचित्र उड्या मारून केलेल्या डान्सने जाण्या-येणाऱ्या प्रवाशांना त्रास होतोय याचेही तिला भान नाही.

Viral Video
Pune News: पुण्यात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने जवानाचा मृत्यू, प्रशिक्षण घेताना घडली घटना

डान्स करता करता ती प्रवाश्यांच्या अदूनमधून कसेही कुठेही डान्स करत सैरावैरा पळते. यावेळी रेल्वे स्टेशनवरील प्रवासी तिच्याकडे अगदी विचित्र नजरेने बघत आहेत. या व्हिडीओचा काही लोक चांगलाच आनंद घेत आहेत तर काहीजण संताप व्यक्त करत आहेत. हा व्हायरल व्हिडीओ नांगलोई रेल्वे स्थानकातील असल्याचे सांगितले जात आहे.

आत्तापर्यंत हा व्हिडिओ १५ लाखांहून अधिक युजर्सनी पाहिला आहे, तर १५ हजारांहून अधिक युजर्सनी लाईकही केला आहे. या व्हिडीओवरील कमेंट्सही अधिक भन्नाट आहेत. एका युजरने लिहिले की, एखाद्या दिवशी कुणाकडून तरी ही तरुणी मार खाईल. तर दुसऱ्या एका युजर्सने म्हटले की, अरे कोणीतरी दीदीला हॉस्पीटलमध्ये घेऊन जा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com