Pune News: पुण्यात हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने जवानाचा मृत्यू, प्रशिक्षण घेताना घडली घटना

Latest News: विजय यांच्या मृत्यूमुळे कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.
Pune College of Military
Pune College of MilitarySaam Tv

Pune News: पुण्यामध्ये प्रशिक्षण घेत असताना जवानाचा दुर्दैवी मृत्यू (Pune Jawan Death) झाल्याची घटना समोर आली आहे. पुण्याच्या कॉलेज ऑफ मिलिट्रीमध्ये (Pune College of Military) ही घटना घडली आहे. विजय पाडुरंग जाधव (Vijay Jadhav) असं या मृत जवानाचे नाव आहे. विजय यांच्या मृत्यूमुळे कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.

Pune College of Military
Unseasonal Rain News : नागपूरसह विदर्भातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पाऊस आणि गारपीटीने झोडपलं; शेतीचं मोठं नुकसान

मिळालेल्या माहितीनुसार, विजय पाडुरंग जाधव (39 वर्षे) या जवानाचा मृत्यू झाला आहे. विजय हे मुळचे साताऱ्यातील कोरेगाव तालुक्यातील चिमणगावचे रहिवासी होते. पुण्यात कॉलेज ऑफ मिलिट्री येथे प्रशिक्षण घेताना त्यांचा मृत्यू झाला. प्रशिक्षणादरम्यान धावत असताना त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांचा मृत्यू झाला.

विजय जाधव यांच्या निधनामुळे साताऱ्यातील त्यांच्या मूळगावी शोककळा पसरली आहे. त्यांच्या पाश्चात पत्नी, दोन मुलं, आई, वडील, भाऊ, पुतण्या असा परिवार आहे. विजय जाधव यांच्या पार्थिवावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Pune College of Military
Pune Crime News: पुणे जिल्ह्यात सिनेस्टाईल खूनाचा थरार! आधी झोपेतच भावजयीची निर्घृण हत्या; पळून जाताना त्याचाही गेला जीव

विजय जाधव हे भारतीय सैन्य दलात 114 बॉम्बे इंजिनिअर ग्रुपमध्ये 21 वर्षांपासून कार्यरत होते. सध्या ते झाशीमध्ये कर्तव्य बजावत होते. पण पुण्यात प्रशिक्षण घेताना त्यांचा मृत्यू झाला. विजय जाधव यांनी शिक्षण पूर्ण केल्यांनतर 2001 मध्ये साताराच्या पोलिस दलात शिपाई म्हणून भरती झाले होते.

त्यानंतर विजय जाधव यांनी पुण्यातील बॉम्बे इंजिनिअर येथे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर विजय यांची नेमणूक पतियाला या ठिकाणी झाली होती. विजय यांनी अमृतसर, श्रीनगर, झाशी आणि पुण्यात कर्तव्य बजावले होते. नाईक आणि हवालदार पदावर त्यांनी काम केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com